काही दिवसांपुर्वी पिंपरी बुद्रुक येथील विकास नगरे हा युवक हाताच्या खुब्यामुळे अतिशय त्रस्त होता,त्यास हाताची शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक होते,परंतु घरची परस्थिती हालाखीची असल्याने दाखान्याचा खर्च करणे नगरे कुटुंबियांना शक्य नव्हते. त्यामुळे मुलाच्या हाताची शस्त्रक्रिया कशी करावी हा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला होता.याबाबत युवकाच्या नातेवाईकांनी चि.विकासच्या शस्त्रक्रियेसंदर्भात माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली होती.
आणि लागलीच दत्तामामांनी मुंबई येथील हिरानंदानी हॉस्पिटल च्या संबंधित प्रमुखांशी संपर्क साधुन सदरील विकास नगरे या तरूणावर मोफत उपचार करण्याविषयी विनंती केली होती, यांस अनुसरून हॉस्पिटल प्रशासनाने श्री.भरणे यांच्या विनंतीला मान देत या युवकावर अगदी मोफत उपचार करून अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया ही करण्यात आल्याने नगरे कुटुंबियांचे जवळपास तीन लाख रूपये वाचले आहेत.
या तरूणाला नुकताच डिस्चार्ज मिळाला आहे,या निमित्ताने आज युवा नेते श्रीराज भैय्या भरणे यांनी आज सदरील युवकाची भेट घेत विचारपूस केली.या भेटीने हा युवक अतिशय भारावून गेला होता,शस्त्रक्रिया संबंधी बोलताना त्याचा कंठ दाटून आला होत, माझ्यासाठी दत्तामामा देवासारखे धावून आल्याचे सांगत त्याने भरणे यांचे आभार मानले.एकूणच तालुक्यातील गोरगरिब गरजू रूग्णांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून दत्तामामा देवदूत बनत आहेत.
Home Uncategorized आमदार दत्तामामांच्या एका फोनने तरूणावर मोफत उपचार…होय.. विकास नगरेसाठी दत्तामामा देवदूतच.