गणेश घाडगे: मुख्य कार्यकारी संपादक
निमगाव केतकी :निमगाव केतकी बायपाससाठी शेतकऱ्याची एक इंचही जागा देणार नाही या भूमिकेतून निमगाव केतकी येथे आंदोलन येथील शेतकऱ्यांनी छेडले असून आता निमगाव केतकी बायपास हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे मत तात्यासाहेब वडापुरे यांनी व्यक्त केले.
आज झालेल्या या बेमुदत आंदोलनात निमगाव केतकी परिसरातील बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.“आम्हाला तुमचे पैसै नको आमच्या जमिनी तुम्हाला देणार नाही, आमच हातावरचे पोट आहे जमिनी विकुन किंवा बेघर होऊन करणार काय? असा सवालही उपोषणकर्त्यांमार्फत विचारला जात आहे.निमगाव केतकीतील रिअलायमेंट बायपास रद्द व्हावा यासाठी शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे.जर या राज्यकर्त्यांनी दडपशाहिचे धोरण हाती घेतले तर येणाऱ्या काळात शेतकरी सामुहिक आत्महत्या करणार असा ईशारा अॅङ सचिन राऊत यांनी आंदोलकांमार्फत दिला आहे.
यावेळी आंदोलनासंदर्भात व शासनाचे चुकीचे धोरण कशी आहेत याबद्दलही व्यवस्थितपणे व अभ्यासपूर्वक सविस्तर मुद्दे सर्जेराव जाधव (गुरुजी) यांनी मांडले. शेतकऱ्यांच्या बाजूने शेवटपर्यंत आम्ही लढू शेतकऱ्यांना भूमिहीन होऊन देणार नाही, वेळप्रसंगी आंदोलन तीव्र करू अशा भावना यावेळी व्यक्त केल्या जात होत्या. यावेळेस या आंदोलनात निमगाव केतकी चे ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब वङापुरे अँड.सचिन राऊत, सर्जेराव जाधव, संदीप भोंग, कुलदीप हेगडे, दादासो आदलिंग,बाळू आदलिंग, सचिन चिखले, धनाजी आदलिंग,विजय भोंग, दीपक भोंग, विष्णू भोंग, दत्तात्रेय पांडुरंग भोंग, सुरेश वङापुरे,बाबासो वङापुरे, हरि बरळ, भगवान बरळ,किसन वङापुरे,शिवाजी वङापुरे तसेच निमगाव परिसरातील समस्त ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी होते.
आता येणाऱ्या काळात हा विषय शासन कशा पद्धतीने हाताळणार? निमगावकर यांना यातून कसा मार्ग निघतो? हे काही काळात समजेल व याची उत्सुकता निमगावकरांना नक्कीच आहे.
दिनांक 27 जुलै 2021 रोजी याबाबत ग्रामस्थांनी तहसीलदार यांना निवेदन देत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या पहा लिंक ओपन करून…. 👇👇
https://youtu.be/p_fIAmzVT4Q