वैभव पाटील :प्रतिनिधी
मुंबई ते डहाणू पर्यंत कार्यरत असलेल्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातीहितवर्धक मंडळाच्या कै.कामिनी व कै. दत्तात्रय धर्माजी अधिकारी स्मरणार्थ व अन्य दाते स्मरणार्थ विद्यार्थी आर्थिक मदत वितरण कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष संतोष पावडे यांच्या अध्यक्षतेखाली पालघर येथील कै.गोविंदराव दादोबा ठाकूर सभागृह पालघर येथे आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन गणेश रामचंद्र पाटील ,उद्योजक तथा पोलिस पाटील गिरनोली यांनी केले. तर प्रमुख अतिथी म्हणून बोईसर येथील इन्फिनिटी इंजिनिअरिंग हाऊस ऑफ स्विचगीअर्स अँड ऑटोमेशन चे प्रो.प्रा विशाल तुकाराम राऊत व राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक ,पत्रकार तथा सू. क्ष.युवक मंडळाचे माजी विश्वस्त वैभव पद्माकर पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक श्री गणेश पाटील यांनी विद्यार्थ्यांनी मंडळ करीत असलेल्या मदतीची सतत जाणीव ठेवावी असे मत व्यक्त करून मंडळास आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद दिले.प्रमुख पाहुणे पत्रकार वैभव पाटील यांनी मार्गदर्शन करताना मुलांनी आपले ध्येय निश्चित करावे ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे,प्रयत्नात सातत्य असेल तर यश मिळणारच गोष्ट व उदाहरण देऊन सांगितले.शिक्षणासाठी आपली परिस्थिती,वय कधीच आडवे येत नाही आपली इच्छा असावी लागते असे बोलून सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.तर विशाल राऊत यांनी आपले अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर करताना आपला उद्योग नोकरी करून कसा उभारला,आपण डोळ्यासमोर एखले उद्दिष्ट ठेऊन स्वताला झोकून देऊन काम केले तर यशस्वी होता येते हे स्व अनुभवातून सांगितले.ह्यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष, समाजरत्न,समाजभूषण राजाराम पाटील ,समाज भूषण मार्तंड पाटील,विश्वस्त अशोक ठाकूर, विषणुकांत राऊळ,शरद पाटील,विजय पाटील,विवेक कोरे ,सल्लागार नागेश राऊळ,मार्तंड पाटील दिलीप राऊत ,नरेश कोरे तसेच मंडळाचे अनेक आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी संजय पाटील,कार्याध्यक्ष मुकेश महाले,उपाध्यक्ष जयवंत हरिश्चंद्र राऊळ, विलास पाटील,खजिनदार रोहिदास पाटील,सहचिटनिस जयवंत राऊळ,अनिल पाटील कार्यकारिणी सदस्य कल्पेश पावडे,दिवाकर पाटील ,भूपेश पाटील ,सुभाष पाटील, माजी सचिव विनोद पाटील,रमेश पावडे,महिला संघटक व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष संतोष पावडे यांनी केले आपल्या प्रास्ताविक मध्ये मंडळाचे दाते,उपक्रम आणि मंडळ विद्यार्थांना करीत असणाऱ्या पुस्तके,आर्थिक मदत ह्या बाबतची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले तर यादी वाचन जयवंत राऊळ व अनिल पाटील यांनी केले .वसतिगृहातील विद्यार्थी,व्यवस्थापक भारती पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Home Uncategorized सकारात्मक बातमी: सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातीहितवर्धक मंडळा कडून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत वाटप.वाचा...