👉पिटकेश्वर येथे १ कोटी १८ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ.
२०१४ साली मी विरोधी पक्षाचा आमदार होतो,परंतु माझ्या रक्तातच काम असल्याने इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी निधीची कसलीही कमतरता भासू दिली नाही,त्यामुळे आता जरी आपले सरकार नसले तरी पिटकेश्वर गावच्या विकासामध्ये किंचितही खंड पडू देणार नाही अशी ग्वाही माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी येथील जाहीर सभेमध्ये दिली.पिटकेश्वर येथील श्री भरणे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या सुमारे १ कोटी १८ लाख इतक्या पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,श्रीमंत ढोले सर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ,पंचायत समितीचे माजी सभापती बापूराव शेंडे,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश शिंदे सर,राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, सोमेश्वर वाघमोडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यानिमित्ताने उपस्थितांना संबोधित करताना श्री भरणे यांनी सांगितले की,ज्यांना जनतेने मोठ्या विश्वासाने २० वर्षे निवडून दिले,त्यांना शो बाजी आणि जाहिरातबाजी सोडून तालुक्यासाठी काहीही करता आले नाही.कारण त्यांना विकासापेक्षा सत्ता महत्त्वाची होती त्यामुळे माजी लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे अशी घणाघाती टीका त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली.
परंतु २०१२ साली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यापासून ते आज तागायतपणे तालुक्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करत आहे,शेवटी माझ्या रक्तातच काम आहे.त्यामुळे जरी आपण विरोधी पक्षाचा आमदार असलो तरी शेवटी आमदार हाच तालुक्याचा प्रमुख असतो.त्यातच तुम्ही लोकांनी मला एवढे परफेक्ट केले आहे की,विकास निधी कुठून कसा आणायचा याचे माझ्यावर सोडून द्या, तसेच विकासकामांच्या बाबतीमध्ये पिटकेश्वरकरांनी काळजी करू नये तुमच्या साठी जे-जे काय करता येईल ते-ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न मी करेन हा विश्वासही त्यांनी उपस्थितांना दिला. त्याचबरोबर इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा माझ्यावरती असेच प्रेम असू द्या!ही अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली .
या कार्यक्रमासाठी सरपंच सुनीता भोसले,उपसरपंच शहाजी गायकवाड,माजी सरपंच सुशीला भिसे,शंकर भिसे,अमोल भोंग, प्रवीण भिसे,रामदास राऊत, रामभाऊ मोरे,विष्णू झगडे,डॉ.सुधीर अभंग,संजय कांबळे,दैवत पवार,अंकुश मस्के, शिवाजी किरकत,अमोल किरकत,ग्रामपंचायत सदस्य लखन जाधव,विजय मस्के,सचिन अभंग,वनिता किरकत,संगीता आदलिंग,अश्विनी मिसाळ यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Home Uncategorized “पिटकेश्वरकरांनो काळजी करु नका,हा मामा..तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे”-माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे...