उमरड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात

करमाळा(प्रतिनिधी: देवा कदम):- करमाळा तालुक्यातील उमरड या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी शाळेतील सर्व स्टाफ व कर्मचारी हजर होते.एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना आण्णा भाऊ साठे यांच्या जीवनाचे चरित्र समजावून सांगण्यात आले तसेच आण्णा भाऊ साठे यांच्या कविता व कादंबऱ्या मधील लेख ऐकवण्यात आले.अण्णा भाऊ साठे हे नक्की कोण होते व त्यांचे कार्य काय होते.याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या वेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भिल सर, यांनी दिली. या कार्यक्रमास दिलीप भोसले,बापूसाहेब भोसले,मुकुंद राऊत,यादव सर,वाघमारे मॅडम,साळुंखे मॅडम व जिल्हा परिषद शाळेच्या सलगर ताई इ.होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here