सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ इथं एकच घरातील नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. डॉ. माणिक वनमोरे घरात सहा मृतदेह तर निवृत्त शिक्षक पोपट वनमोरे यांच्या घरात तीन मृतदेह आढळून आले आहेत.घटनास्थळी पोलिस पंचनामा सुरू असून अधिक माहिती घेण्याचं काम सुरू आहे. आत्महत्या केलेल्या पोपट वनमोरे यांच्या खिशात एक चिठी सापडली असून, या चिठीत काही लोकांची नावे आणि सांख्यिकी आकडेवारी आहे. गुप्तधनाच्या मागे लागून कर्जबाजारी झाल्याने कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र आत्महत्ये नेमकं कारण आद्यप स्पष्ट झाले नाही.
मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजेचे शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. तर वनमोरे कुटुंबीयांच्या घरातील जेवणाचे नमुने मुंबईच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
आत्महत्या केलेल्यामध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय 52), संगीता पोपट वनमोरे (वय 48), अर्चना पोपट वनमोरे ( वय 30), शुभम पोपट वनमोरे (वय 28), माणिक यल्लाप्पा वनमोरे (वय 49), रेखा माणिक वनमोरे (वय 45), आदित्य माणिक वन (वय 15) अनिता माणिक वनमोरे (वय 28) आणि अक्काताई वनमोरे (वय 72) या नऊ जणांचा समावेश आहे.
Home ताज्या-घडामोडी मिरज येथील सामुदायिक आत्महत्या प्रकरणात सबळ पुरावा पोलिसांच्या हाती,खिशात सापडली चिठ्ठी.