महाराष्ट्रात खळबळ उडवणाऱ्या (नॉट रिचेबल) 13 आमदारांची नावे व 2 खासदारांची नावे वाचा,काय असू शकते कारण? वाचा.

महाविकास आघाडी सरकारवर सर्वात मोठं संकट ओढावलं आहे. नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलंय. शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह सूरतमधील हॉटेलमध्ये आहेत.
😌👉एकनाथ शिंदे नाराज का? एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून खदखद सुरू होती, असं समोर आलं आहे. मराठा समाजाच्या विषयावरून ही खदखद टोकाला गेली होती. यातून एकनाथ शिंदे यांना बाजूला करून मराठा समाजाची थेट मनं जिंकण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू होता.त्यासाठी विनायक राऊत यांना पुढे करून मराठा समाजाच्या नेत्यांशी बैठका सुरू होत्या.
येत्या दोन दिवसात मराठा समाजाच्या नेत्यांशी मुख्यमंत्री थेट बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार होते. मराठा समाजाचे शैक्षणिक प्रश्न आणि नोकर भरती बाबत ही बैठक होणार होती. त्यासाठी एकनाथ शिंदेना डावलून विनायक राऊत यांना मुख्यमंत्र्यांनी पुढे केले होते. मुंबईतील एका हॉटेलमध्ये या गाठीभेटी झाल्या होत्या.या कारणामुळे शिंदे नाराज होते अशी चर्चा आहे.
गायब(नॉट रिचेबल )आमदार/खासदार नावे:-
साताऱ्याचे आमदार महेश शिंदे
सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले
पंराड्याचे आमदार तानाजी सावंत
बुलढाण्याचे आमदार संजय रायमूलकर
मेहकरचे आमदार संजय गायकवाड
बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांचा मोबाईल बंद आहे
सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार
पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे
औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट
कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे
भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर
महाडचे भरत गोगावले
👉 खासदार राजन विचारे,खासदार श्रीकांत शिंदे हे सुध्दा संपर्कात नाहीत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here