इंदापूर || दिनांक 18 मे रोजी स्वप्निल नाझरकर राहणार श्रीराम सोसायटी इंदापूर यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला होता. तसेच स्वप्नील यांच्या मालकीची सीएस गाडी एम एच 42 बी बी 2630 या चार चाकी गाडीसह एकूण किंमत रुपये 11 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला होता. सदर गुन्ह्यात इंदापूर पोलिसांनी संपूर्ण चोरीची माहिती व अभ्यास केल्यानंतर मुंबई येथे जाऊन आरोपींना गाडीसह ताब्यात घेऊन अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेली सीएस गाडी एम एच 42 बी बी 2630 एकूण किंमत 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यांमध्ये इंदापूर शहरातील मागच्याच वर्षी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केलेला आरोपी राहुल पवार याला देखील अटक करण्यात आलेली आहे. आणखी 2 आरोपी फरार आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री मोहिते साहेब, डीवायएसपी श्री इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक टीवाय मुजावर,एपीआय धनवे, माने, पाटील, पीएसआय धोत्रे,महिला पीएसआय जाधव, पोलीस हवालदार बापू मोहिते, पोलीस हवालदार सलमान खान, पोलीस हवालदार चौधर, पोलीस हवालदार हेगडे, पोलीस हवालदार जाधव, पोलीस नाईक नरळे, पीएसआय ढवळे यांनी सदर आरोपी व मुद्देमाल शोधण्यासाठी अथक प्रयत्न केले होते.. सदरची चोरी झालेली संपूर्ण तालुक्यात चर्चा असतानाच आता इंदापूर पोलिसानी अवघ्या 4 दिवसात आरोपींना पकडून अशक्य काम शक्य करून दाखवले आहे.त्यामुळे आता इंदापूर तालुक्यात इंदापूर पोलिसांवर नागरिकांचा विश्वास संपादित होत चालला आहे.