राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संभाजीराजे यांना उमेदवारीसाठी ऑफर देण्यात आली होती. मात्र,संभाजीराजे यांच्याकडून शिवसेनेकडून निवडणूक लढण्याबाबत होकार आला नाही.अखेर आज शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार निश्चित केला आहे आणि या उमेदवाराचे नाव जाहीर केल्याचं वृत्त समोर येत आहे. या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेकडून कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. शिवसेनेने संजय पवार यांना आपले उमेदवार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
संभाजीराजे छत्रपती यांना दिलेल्या ऑफरवर कुठलाही प्रतिसाद न आल्याने अखेर आज शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केला असल्याची माहिती समोर येत आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिलं आहे. संजय पवार यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. तसंच नगरसेवक ते जिल्हाप्रमुख असा त्यांचा प्रवास राहिला आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेवर अपक्ष लढणार असल्याची भूमिका यापूर्वीच संभाजीराजे यांनी घेतली. सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला पाठिंबा देण्याची मागणी सुद्धा संभाजीराजेंनी केली आहे. पण आता शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं असल्याने आता संभाजीराजे छत्रपती काय भूमिका घेतात, तसेच संभाजीराजे अपक्ष निवडणूक लढवणार का? हे पहावं लागेल.
👉“मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा झाली आणि…” आज प्रथमच संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं, “माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. सविस्तर बोलणं झालं आहे. पुढे काय करायचं हे सविस्तर ठरलेलं आहे.
मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील. मला हा सुद्धा विश्वास आहे की, मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील. धन्यवाद.” संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं, आम्ही नक्की छत्रपती घराण्याचा मान राखून संभाजीराजेंना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव दिला मी इतकंच सांगू शकतो. राज्यसभेच्या दोन जागेवर शिवसेना निवडणूक लढवणार आहे
Home ताज्या-घडामोडी अखेर..शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी उमेदवारी निश्चित. जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी.