काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या तालुकाध्यक्षपदी लुमेवाडी गाव चे नाशीर शेख यांचा निवड

काल पुण्यातील काँग्रेस भवन येथे महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन व पुणे जिल्हा काँग्रेसचे संपर्क मंत्री मा नामदार सुनील जी केदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील आढावा व समस्या संदर्भात बैठक झाली
या बैठकीमध्ये नशिर अब्दुल गणी शेख यांना इंदापूर तालुका काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र सुनील जी केदार यांच्या हस्ते देण्यात आले हे पत्र जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जमीर काझी यांच्या सहीचे आहे
नसिर शेख हे लुमेवाडी चे रहिवासी असून ते लुमेवाडी येथील प्रसिद्ध दर्ग्याचे संस्थापक ट्रस्टी आहेत . ते गेल्या 25 वर्ष पासून ट्रस्टी म्हणून काम करत आहेत. ते लुमेवाडी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य ही आहेत. लुमेवाडी, सराटी, पिंपरी, टनु भागत त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.
यावेळी बोलताना नशीर शेख म्हणाले की जिल्हाध्यक्ष संजय जी जगताप व तालुकाध्यक्ष स्वप्नील भैय्या सावंत यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील अल्पसंख्याक समाजात मधील प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करेल
यावेळी पुणे जिल्हा काँग्रेस च्या अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जमीरभाई काजी यांच्यासह इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत, कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जकिर भाई काजी, शहराध्यक्ष चमन भाई बागवान, किसान काँग्रेस सेलचे तालुकाध्यक्ष डॉक्टर संतोष होगले, सरचिटणीस महादेव लोंढे, निवास शेळके, संतोष आरडे, खजिनदार भगवान पासगे, जिल्हा ओबीसी सेलचे उपाध्यक्ष आकाश पवार, अनुसूचित जाती जमाती विभाग सेलचे तालुकाध्यक्ष युवराज गायकवाड, श्रीनिवास पाटील, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here