राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची झंजावात विकासाची फटकेबाजी- शुक्रवारी होणार तब्बल 45 कोटी 43 लक्ष कामांचे भूमिपूजन व उद्घाटने..

इंदापूर: गेल्या काही महिन्यांपासून इंदापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या कामांसाठी विकासनिधींचा महापूर आणण्याचे काम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे सध्या करताना दिसत आहेत.तालुक्‍याच्या नकाशातील चारही बाजूंच्या गावांमध्ये रस्ते,गटारी,सभागृहे,वेगवेगळे पूल, पानंद रस्ते इत्यादी कामांसाठी कोट्यावधी रुपये आणण्याचे काम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून उद्या म्हणजेच शुक्रवार दिनांक 6 मे रोजी तब्बल 45 कोटी 43 लाख रुपयांच्या कामांचे उद्घाटने व भूमिपूजन समारंभ होणार असून याच दिवशी सुरवड या गावी जाहीर सभाही होणार आहे.शुक्रवारी होणाऱ्या या 45 कोटी 43 लक्ष रुपयाच्या विविध विकास कामांचे उद्घाटनामध्ये रेडा-शेटफळ हवेली-सुरवड भांडगाव रस्ता 13कोटी रुपये, सराफवाडी व रेडा येथील पूल 1 कोटी 57 लाख रुपये, लाखेवाडी-पिठेवाडी- निर निमगाव-सराटी-गणेशवाडी रस्ता 8 कोटी 50 लाख, खोरीची-पिठेवाडी ते सराटी रस्ता व पूल बांधकाम 8 कोटी रुपये, निरनिमगाव कचरवाडी ते सराटी रस्ता 9 कोटी, रेडा 1 कोटी, रेडनी 64 लाख, पिठेवाडी 2 कोटी 10 लाख, निरनिमगाव 35 लाख,शेटफळ हवेली 40 लाख, सुरवड 68 लाख,अशा विविध विकासकामांचे भूमिपूजने आणि उद्घाटने समारंभ शुक्रवारी होणार आहे.या कामांचे उद्घाटन दत्तामामा भरणे यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर असणार आहेत. त्याचप्रमाणे या प्रचंड मोठ्या विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, युवा नेते प्रवीणभैय्या माने, मा सभापती प्रशांत बापू पाटील, मा जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले सर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले राष्ट्रवादीचे इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, मा सभापती स्वातीताई शेंडे, इत्यादी उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता रेडा, त्यानंतर सायंकाळी 4.30 रेडणी, त्यानंतर 5 वाजता पिठेवाडी, निरनिमगाव व कचरवाडी ला 5.30 वाजता, शेटफळ हवेली येथे सायंकाळी 6.30 वाजता उद्घाटने होणार आहेत व ही सर्व उद्घाटने पूर्ण झाल्यानंतर सुरवड या गावी सायंकाळी 7 वाजता जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे 7 वाजता च्या सभेमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे काय बोलतात याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे..

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here