इंदापूर: काल महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर राजकारण चांगलेच पेटलेली दिसून आले. आयोगाच्या या निर्णयामुळे सोशल मीडियात मात्र कही खुशी.. तो कही गम.. अशा दोन्ही प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. “निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे तो लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. शिवसेनेला ठाकरेंपासून कोणीच वेगंळ करू शकत नाही. शिवसेना आणि ठाकरे हे वेगळं समीकरण आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला असला तरी जनता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय देईल.निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, त्यांनी योग्य निर्णय दिला पाहिजे होता. परंतु, त्यांनी एकतर्फी निर्णय दिला आहे“ असे शिवसेना इंदापूर तालुकाप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नितीन शिंदे म्हणाले.
“भाजपची ही हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही, जनता याचं निक्कीच उत्तर देईल,येणाऱ्या काळात जनता शिवसेनेच्याच पाठीमागे असेल असा दावा करत कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या मागे उभा राहून त्यांच्यासोबत लढा देऊ” असे यावेळी नितीन शिंदे म्हणाले.
शिवसेना आणि धनुष्यबान चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. निवडणूक आयोगाने आज जो याबाबतचा निर्णय दिलाय या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.एकंदरीतच आता पुढीलवर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत याबाबत जनता कोणाच्या बाजूने कौल देईल हे पाहण्याजोगे ठरेल.