प्रतिनिधी:नसीर बागवान
कुर्डूवाडी:कुर्डूवाडीतील रेल्वे शाळेच्या ग्रंथालय व क्रीडा साहित्य व इतर साहित्य ठेवलेल्या खोल्यांना अचानक आग लागली यात लाखो रुपयांचे नुकसान झाले ही आग 21 एप्रिल सकाळी दहा वाजता लागली आगीचे कारण समजू शकले नाही मात्र रेल्वे शाळा गेल्या तीन वर्षापासून बंद आहे त्यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही. रेल्वे कॉलनी मध्ये असलेली शाळा 1919 पासून कायमस्वरूपी बंद आहे झाली परंतु या इमारतीत कुठलेही कामकाज चालत नाही कायम कुलूप बंद असलेल्या इमारतीत ग्रंथालय चे पुस्तके क्रीडा साहित्य व इतर साहित्य आहे शाळा कायमची बंद झाली असल्यामुळे हे साहित्य वर्ग करणे आवश्यक असताना शाळेच्या ग्रंथालयात अनेक पुस्तके पडून होती प्रशालेची इमारत झाडांच्या हरवळे ने नटलेली आहे मात्र याची देखभाल होत नसल्यामुळे शाळेच्या छपरावर पालापाचोळा साटला असताना 21 एप्रिल सकाळी दहा वाजता आग लागल्याने धुराचे लोट दिसू लागल्याने जवळच असलेल्या इंजीनियरिंग विभागातील इंजिनीयर चव्हाण लखन मगर शेख औदुंबर सुतार शाहिद शेख आदींनी अग्निरोधक सिलेंडर घेऊन घटनास्थळी पोहोचले व 25 सिलेंडरच्या माध्यमातून आग आटोक्यात आणली त्यानंतर नगर परिषद च्या अग्निशामक दलाने आग विझवली आगीचे माहिती समजतात रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी व कर्मचारी व पोलीस ठाण्याचे पोलीस या ठिकाणी उपस्थित झाले.इतर वर्गात अद्याप साहित्य आहे.बंद शाळेत अजूनही पुस्तके क्रीडा साहित्य बेंच सरकारी दप्तर शालेय उपयोगी साहित्य आहे तरी त्यांची आणखीन होण्याची वाट न पाहता इतर शाळेला वर्ग केले तर त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल साहित्य हलवण्यासाठी पत्रव्यवहार मात्र दुर्लक्ष रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी या शाळेच्या संबंधित अधिकार्यांशी वर्गखोल्या मध्येअसलेले साहित्य हलवण्याबाबत पत्रव्यवहार केला होता मात्र त्याकडे दुर्लक्ष केले दिसत आहे या घटनेनंतर तरी संबंधित अधिकाऱ्याला जाग येईल का असा सवाल उपस्थित होत आहे
Home ताज्या-घडामोडी कुर्डूवाडीतील रेल्वे शाळेच्या ग्रंथालय व क्रीडा साहित्य व इतर साहित्य ठेवलेल्या खोल्यांना...