आता इंदापूरकरांना मिळणार १२ महिने ऊसाचा ताजा रस, युवा उद्योजक विनोद हरणावळने सुरू केले ‘इन्द्रेश्वर रसवंतीगृह व ज्यूस सेंटर’..

इंदापूर:कोणताही व्यवसाय करताना त्यांची गुणवत्ता टिकून ठेवणे व सद्यस्थितीत बाजारात कोणीती मागणी आहे याच गणित जुळलं की व्यावसायाचा जम बसाय वेळ लागत नाही. हेच सूत्र इंदापूर शहरातील विनोद हरणावळ या युवकाला जुळले असावे म्हणूनच त्याने ऑरगॅनिक पद्धतीचे आणि शरीराचा फायदेशीर असणाऱ्या ऊसाच्या रसाचे दुकान व ज्यूस सेंटर थाटले.खास इंदापूरकरांच्या सोयीसाठी विनोद हरणावळ याने गुजरात राज्यातुन ऑरगॅनिक पद्धतीने उसाचा रस काढण्याचे यंत्र मागवले आणि सुरू केला व्यवसाय. आता त्यांच्या व्यवसायाला इंदापूरकरांनीही पसंती देत त्याच्या या व्यवसायाला प्रतिसाद दिला आहे.
  सध्या वातावरणात उष्णता जाणवू लागल्याने रसवंती गृह आणि ज्यूस स्टालकडे ग्राहकांची पावले वळायला लागली आहेत. मागील दोन वर्षांच्या कोरोना कालखंडामध्ये रसवंतीगृह यांचे अर्थचक्र बंद पडले होते. रस्त्याच्या कडेला उन्हाळ्यामध्ये दिसत असलेली रसवंती गृह, ज्यूस सेंटर, कलिंगडाची दुकाने, नीरा विक्री केंद्र त्यासोबतच इतर थंड पेय विक्री करणारे व्यावसायिक दिसतात. चालू वर्षी नुकताच उन्हाळा कडक असल्याने व कोरोना नियम शिथिल झाल्याने शीत पेय विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचा चेहऱ्यावर हसू उमटले आहे. इंदापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व इंदापूर कोर्टाशेजारी असलेल्या पटेल यांच्या गाळ्यांमध्ये विनोद हरणावळ व प्रवीण हरणावळ या भावंडांनी ‘इन्द्रेश्वर ज्यूस सेंटर’ या नावाने उसाचा ताजा व मधुर रसाचे दुकान चालू केले आहे.
खास ऑरगॅनिक पद्धतीने आणि बर्फ़ाविना थंडगार रस  अगदी माफक दरात या ठिकाणी मिळणार असून इतरही फळांचे ज्यूस यावं ठिकाणी उपलब्ध असणार असल्याची माहिती विनोद हरणावळ यांनी दिली.
उन्हाळ्यात विविध शीतपेयांची मागणी वाढत असते.त्यामध्ये सर्वांत जास्त पसंती असते ती उसाच्या रसाला. सर्वत्र उपलब्ध आणि कमी किमतीतील हे पेय. प्रामुख्याने उसाचा रस हा आरोग्यालाही फायदा देणार आहे तर उसाचा रस हा बऱ्याच आजाराला दूर ठेवतो.
विनोद हरणावळ यांनी चालू केलेला उसाचा रस हा वर्षभर सर्व सिजन मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here