प्रतिनिधी: महेश सूर्यवंशी
देऊळगाव राजे ,दौंड . येथील कु. गणेश हनुमंत गिरमकर याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत परीक्षेतून 220 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्याची निवड सहाय्यक अभियंता राजपत्रित (वर्ग 2) पदी झाली आहे. तसेच कु.वैभव तुकाराम आवचर याची एम.पी.एस.सी मार्फत मंत्रालय कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली , कु . शिवचरण अर्जुन सूर्यवंशी याची इंडियन एअर फोर्स मध्ये गरुड पॅरा कमांडो म्हणून नियुक्ती झाली , आणि वैद्यकीय शिक्षणासाठी पुणे,मुंबई आणि सांगली येथे एम.बी.बी.एस.पदिवी मध्ये शिक्षण घेत असलेले कु.तन्मय संजय सांगळे , कु. अथर्व भानुदास खोसर, कु.शुभम रमेश साळुंखे यांचा सत्कार व गुणगौरव समारंभ अमीतदादा गिरमकर मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ देऊळगाव राजे यांच्या वतीने रात्री (दि.18 एप्रिल) रोजी आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यासाठी तालुक्याचे माझी आमदार श्री.रमेश (आप्पा) थोरात, भाजप किसान मोर्चाचे महा.प्रदेश अध्यक्ष श्री वासुदेव (नाना) काळे, जिल्हा परिषद सदस्य श्री वीरधवल (बाबा) जगदाळे.दौंड ता.राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष . अप्पासाहेब पवार. आमंत्रित करून यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आले. या वेळी कु. गणेश गिरमकर बोलताना यशामागाचे कष्ट आणि खडतर प्रवासाबद्दल सांगत पंचकृशितील उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले व या यशाचे श्रेय आपल्या आई व पालकांना दिले. या कार्यक्रमा मागील हेतू भविष्यात देऊळगाव राजे मधील विद्यार्थ्यांना आणिपालकांना प्रेरणा व मार्गदर्शन भेटल तसेच नवनियुक्त अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस हुरूप यावा असे अमितदादा मित्र मंडळाने सांगितले . पंचकृशितील ग्रामस्थांकडून या गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडत होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रा.दिनेश पवार यांनी केले.