श्री गणेश उत्सव मंडळ लालठाणे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे.

वैभव पाटील :पालघर जिल्हा प्रतिनिधी (9850868663)
सफाळे रेल्वेच्या पूर्वेकडे असलेले निसर्गरम्य किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले लालठाणे गाव या गावातील जाणकार मंडळीने श्री गणेशोत्सव मंडळाची स्थापना 1973 साली केली.यावर्षी मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष मोठ्या दिमाखात साजरे होत आहे. गुरुवार दि.8 सप्टेंबर पर्यंत मंडळांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. मंगळवार दि.6 सप्टेंबर रोजी समाज प्रबोधन पर प्राध्यापक डॉक्टर महादेव दिनकर इरकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी मंडळाकडून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .अशी माहिती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रफुल पुंडलिक पावडे यांनी दिली .यावेळी मोठ्या संख्येने मंडळाच्या आजी-माजी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here