करमाळा(प्रतिनिधी: सविता आंधळकर)सध्याच्या कोरोनाच्या संकटांमध्ये शेतकरी अगोदरच अडचणीत असल्याने वीज वितरण कंपनीने वीज तोडण थांबवावे आणि शेतीसाठी आठ तास अखंड वीज द्यावी यासाठी माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या उपस्थितीत काल करमाळा तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले आहे. या वेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी कोणाचे कर्ज बुडविलेले नाही शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही तसेच महावितरण कंपनीनेही मनमानी करू नये. शेतकरी अगोदरच कर्जबाजारी असताना आणि पिकांचे पैसे येण्या अगोदर च्या स्थितीत वीज तोडणे चुकीचे आहे. तसेच वरिष्ठांनीही समजून घ्यायला हवं . नगदी पिकांचे पैसे आल्यानंतर शेतकरी पैसे देणार असल्याने, कोणत्याही प्रकारची जबरदस्ती न करता शेतीसाठी आठ तास अखंड वीज द्यावी. अशा मागणीचे निवेदन माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे….