इंदापूर येथे उपविभागीय पोलीस कार्यालयाची गरज – हर्षवर्धन पाटील

इंदापूर :इंदापूर तालुक्यातील पोलीस स्टेशनची वाढलेली संख्या लक्षात घेऊन इंदापूर येथे उपविभागीय पोलीस कार्यालय निर्माण करण्यात यावे. तसेच श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर बरोबरच बावडा येथेही पोलीस स्टेशन निर्माण करण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली आहे.
इंदापूर तालुक्यात इंदापूर, भिगवण, वालचंदनगर येथे सध्या पोलीस स्टेशन असून नीरा नरसिंहपूर येथे पोलीस स्टेशन मंजूर झाले आहे. त्याबरोबरच बावडा येथेही पोलीस स्टेशन मंजूर करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. सध्या तालुक्यात बावडा, निमगाव केतकी, भवानीनगर येथे पोलीस दूरक्षेत्र कार्यालये आहेत. इंदापूर तालुक्यातून सुमारे 50 कि. मी. लांबीचा मुंबई – हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग जात असून, लोणी देवकर येथे पंचतारांकित एमआयडीसी आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामावरील ताण लक्षात घेता इंदापूर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय असणे हे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गरजेचे आहे. यासंदर्भात लवकरच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार असल्याचेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here