महाराष्ट्राच्या 80 वर्षाच्या योद्धाची कोरोनावर मात. पवारसाहेब सुखरूप, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण.

सामाजिक जीवनात काम करीत असताना अनेक संकटांना तोंड देत अडचणींची अनेक युद्धे जिंकलेले पवारसाहेब यांनी यावेळी कोरोनासारख्या महारोगास हरवून पुन्हा एकदा जनसेवेसाठी उपलब्ध होणार आहेत अशी माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. अवघ्या सात दिवसांमध्ये शरद पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. शरद पवार यांनीच आपण कोरोनामुक्त झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. “आज माझी पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.माझी तब्येत देखील चांगली आहे. मला कोरोना झाल्यानंतर मी लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केली, ते माझे सर्व सहकारी, मित्र, हितचिंतक आणि डॉक्टरांचे मी आभार मानतो” असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
सात दिवसांपूर्वी शरद पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच स्वपक्षासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सुद्धा पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. कोरोनावर मात करून आता पवारसाहेब लवकरच जनसेवेसाठी उपलब्ध होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत व पवारसाहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here