शिवसेनेच्या इंदापूर येथील मेळाव्यास तुफान गर्दी , शिवसेना बनते इंदापूरकरांचा की तिसरा पर्याय.

इंदापुर: इंदापूर शहर व तालुक्यात आगामी नगरपरिषद व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीमध्ये शिवसेनेचे भगवं वादळ तयार करणार असून त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा आदेश घेऊन मी इंदापुरला आलो आहे असं शिवसेना उपनेते तथा पुणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी सांगितले.पुणे सोलापूर रोडवरील वरकुटे पाटी येथील शिवशंभू पॅलेस येथे काल इंदापूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. यावेेेळी त्यांनी तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांचे संंघटन कौशल्याबद्दल कौतुक केले
यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख , सहकार सेना पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रदीप खोपडे, सहकारसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश जाधव, युवासेना सहसचिव मोहसीन शेख, सन १९८९ चे विधानसभा उमेदवार बलभीमराव जाधव, जिल्हा समन्वयक विशाल बोन्द्रे, जिल्हा समनव्यक भीमराव भोसले, उपजिल्हाप्रमुख संजय काळे, तालुकाप्रमुख नितीन शिंदे, शहरप्रमुख महादेव सोमवंशी, तालुका संघटक सुदर्शन रणवरे, तालुका समनव्यक अरुण पवार, तालुका समनव्यक माऊली चौगुले, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका शारदा सोनवणे, महिला तालुका संघटिका पुष्पा घोरपडे, माजी तालुकाप्रमुख योगेश कणसे, नितीन कदम, शिवसहकार सेनेचे सुरज काळे, माथाडी कामगार सेनेचे पश्चिम महाराष्ट्र संयुक्त सरचिटणीस दुर्वास शेवाळे, युवा सेनेचे सचिन इंगळे उपस्थित होते.पुढे बोलताना अहिर म्हणाले महाराष्ट्रामध्ये सध्या महाविकास आघाडीचे सरकार असून उद्धव ठाकरे हे सरकारचे नेतृत्व करत असून त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कोविड सह इतर नैसर्गिक आपत्तीच्या विरोधात प्रचंड मेहनत करत प्रगती करतो आहे. मुख्यमंत्री देशात नाही तर जगात लोकप्रिय झाले आहेत. लोकांना त्यांच्यावर विश्वास आहे, त्यामुळे त्यांचे विचार आणि कामाची पद्धत आपण अंगीकृत करून जनतेत जाणं गरजेचे आहे.
तालुक्यातील midc, यांच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी मी प्रयत्न करेल. आपण तालुक्यात सक्षम विरोधीपक्ष म्हणून लोकांना पर्याय दिला तर आगामी निवडणूकांमध्ये शिवसेना लोकांचा आवाज बनून इतिहास घडवेल. यापुढे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आम्ही ताकत देणार असल्याचे अहीर यांनी सांगितले.यावेळी आपल्या प्रस्ताविकपर भाषणात शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे म्हणाले इंदापूरमधील शिवसैनिक लढवय्या आहे. दोन मोठ्या शक्ती विरोधात हाती काहीही नसताना लढा देत आहे, आपण वरिष्ठ पातळीवरून ताकत द्या आम्ही इंदापुरला भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.यावेळी जेष्ठ शिवसेना माजी नगरसेवक बलभीमराव जाधव, जिल्हा समनव्यक विशाल बोन्द्रे, भीमराव भोसले, उपजिल्हाप्रमुख संजय काळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी तालुक्यातील सर्व उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक व अंगीकृत संघटनांच्या आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here