प्रतिनिधी: निलेश भोंग
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती इंदापूर शाखेच्या वतीने इंदापूर शहर व तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात कार्यरत असणारे , कोविड १९ काळात अविरतपणे सेवा करणारे , कोविड १९ लसीकरणाचे १०० कोटी माञा पूर्ण केल्याबद्दल इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव , पळसदेव , निमगाव केतकी येथील वैद्यकीय अधिकारी , आरोग्य सेविका , सुपरवाझर , सहाय्यक , सफाई कर्मचारी , शिपाई , रूग्णवाहिका चालक सर्वाचा सत्कार करण्यात आला.
कोविड १९ विरोधात लस प्रभावी असून तालुक्यातील सर्व भागात लसीकरण करण्यात आरोग्य विभागाचा फार मोठा वाटा असून लवकरच तालुक्यात १०० % लसीकरण पूर्ण होईल.असा विश्वास सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी व्यक्त केला.
गुरूजी मुळे मी डाॕक्टर झालो – डाॕ अरविंद अरकिले.:: निमगाव केतकी येथील ग्रामीण रूग्णालयात कार्यरत असणारे डाॕ अरकिले यांनी सत्कार प्रसंगी त्यांच्या आयुष्यात कलाटी देणारा प्रसंगी सांगितला.ते म्हणाले इयत्ता ४ थी असताना परिस्थितीमुळे शाळा सोडावी लागणार होती.परंतु गुरूजींनी माझे ७ वी पर्यतचे शिक्षण स्वखर्चातून केले. अगदी स्वतःच्या घरी राहण्याची व जेवणाची सोय केली.त्यांचे सहकार्य माझ्यासाठी अनमोल आहे.सर्व गुरूजींनी माझा व स्टाफचा सत्कार केल्याबद्दल आभार मानले.
इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्था चेअरमन वसंत फलफले ,तालुका उपाध्यक्ष नजीरभाई शिकीलकर , सरचिटणीस विनय मखरे व शिक्षक नेते नागेश जाधव शिक्षक समितीच्या वतीने कुंभारगाव येथे शिक्षक सोसायटी माजी चेअरमन सुनिल वाघ , संतोष साबळे , यादवराव सोनवणे ,संतोष वणवे ,पळसदेव येथे माजी शिक्षक सोसायटी माजी चेअरमन सुनिल शिंदे ,मोहन लोंढे , रमेश शेलार , सचिन अभंग , भगत सर , राहुल कानगुडे , संजय जाधव , हरिश्चंद्र पवार , व निमगाव केतकी येथे केंद्र प्रमुख संभाजी आजबे ,शिक्षक सोसा माजी चेअरमन किरण म्हेञे ,कोषाध्यक्ष भारत ननवरे ,अतुल जौंजाळ ,अजिनाथ आदलिंग ,राजकुमार राजगुरू , नंदकुमार सूर्यवंशी ,संतोष चोरमले ,सतिष भोंग ,चंद्रकांत रामाणे ,बापूराव जाधव,महिला आघाडी प्रमुख रत्नमाला भोंग , प्रतिभा जौंजाळ,जुनी पेन्शन तालुका अध्यक्ष संतोष हेगडे उपस्थित होते.