प्रतिनिधी: महेश सूर्यवंशी
दौंड, रोटरी क्लब ऑफ दौंड च्या वतीने राज्य राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्र नानवीज,दौड़ येथील 1000 पोलीसांसाठी 2 दिवसीय RYLA ( Rotary Youth Leadership Award) कार्यक्रम अंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
पहिल्या दिवशी आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर श्री राजेंद्र राऊत ( प्रशिक्षक आर्ट ऑफ लिव्हींग)व लग्न पहावे दुरुन या विषयावर डाॅ राजेंद्र भवाळकर यांनी मार्गदर्शन केले दुसरे दिवशी धावण्याचे कौशल्य व आहार या विषयावर डाॅ रोहन खवटे आणि पोलीस व जनता सुसंवाद या विषयावर राज्य राखीव पोलीस दल ग्रुप ७ चे समादेशक मा श्री वसंतराव परदेशी यांनी विशेष मार्गदर्शन केले.यावेळी प्रशिक्षण केंद्र नानवीज चे प्राचार्य श्री रामचंद्र केंडे,रोटरी क्लब ऑफ दौंड चे अध्यक्ष डॉ राजेश दाते,सचिव अमीर शेख,रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ चे अध्यक्ष श्री ठोंबरे ,रोटरी क्लब पाटस चे अध्यक्ष विश्वास अवचट, रोटरी क्लब ऑफ पुणे मीङ ईस्ट चे अध्यक्ष डॉ राजेंद्र भवाळकर , रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड काॅलेज चे अध्यक्ष प्रेम बनसोडे,सचिव स्वाती बगाडे,रोटरी क्लब ऑफ दौंड चे सदस्य राकेश अग्रवाल, सविता भोर ,नवनाथ गोरे, हरिभाऊ ठोंबरे,सुनिल ढगे,प्रमोद पवार,गदादे सर,दिनेश भागवत, उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव अमीर शेख यांनी केले