🛕बापरे, विठ्ठलाच्या मंदिरावर कोसळली वीज, मंदिराची अवस्था पाहून गावकरी हादरले..

संदीप आढाव: विशेष प्रतिनिधी

बुलढाणा: घरांवर किंवा झाडांवर वीज कोसळल्याच्या घटना आपण नेहमी पाहत असतो.वीज ज्या भागावर पडली तो भाग कधी कधी जळून जातो किंवा उद्‌ध्वस्त होतो.बुलडाणा जिल्ह्यात विठ्ठलाच्या मंदिरावर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. विज कोसळल्यानंतर मंदिराचा भलामोठा कळस आणि उंच मनोरा फाटल्याचं दृश्य समोर आलं आहे. मराठवाड्यात अजूनही काही भागात पाऊस सुरूच आहे. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आवार गावात असलेल्या विठ्ठल मंदिरावर सायंकाळी अचानक वीज कोसळली.
वीज कोसळल्यानंतर मंदिराचा कळस व उंच मनोरा फाटला आहे.
संध्याकाळी आवार गावात पाऊस सुरू होता. अचानक गावात भलामोठा आवाज झाला. विज पडल्याची सर्वांनी शक्‍यता बांधली. पण नेमकी वीज कुठे पडली याचा शोध घेतला असता गावातील विठ्ठलाच्या मंदिरावर वीज कोसळल्याचं लक्षात आलं. गावातील लोकांनी लगेच मंदिराकडे धाव घेतली. तेव्हा उंच असा मंदिराचा मनोरा फाटला होता. कळसही उद्धवस्त झाला होता.मंदिरामध्ये जाऊन पाहणी केली असता सर्वत्र धूरच धूर पसरला होता. त्यामुळे विठुराया वरच वीज कोसळल्याने गावकरी चांगलेच भयभीत झाले आहेत. हे मंदिर पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. सुदैवाने यावेळी मंदिरात कुणीही नव्हतं. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. परंतु, या दुर्घटनेत मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here