चौफेर विकासाची उत्तुंग भरारी विकासरत्न हर्षवर्धनजी पाटील साहेब…मानवाला एखादे उच्च पद मिळते ते त्यांच्या कार्यामुळे आणि गुणामुळे एखादे उच्चपद मिळणे हे दैवी प्रेषित असते असा आपला इतिहास सांगतो… इंदापूर तालुक्याला अर्थपूर्ण दिशा देणारे लोकनेते कै.शंकरराव बाजीराव पाटील यांचा वसा व वारसा पुढे चालू ठेवणारे इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते माननीय श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब आहेत…प्रज्ञा किंवा प्रतिभा ही जन्मजातच असावी लागते तसेच नेतृत्व सुद्धा जन्मजात ज्याच्या अंगी असते ते महान पुरुषच समाजाचा विकास करण्यास तत्पर असतात.. राजा शिवछत्रपती व संभाजी महाराज यांची उदाहरणे आहेत अशी हजारो उदाहरणे या भारतभूमीत पहावयास मिळतात त्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. तसा नेतृत्वाचा वारसा चुलते कै.शंकररावजी पाटील व चूलती कै.लीलावती पाटील, वडील कै.शहाजीबापू पाटील व मातोश्री कै.रत्नप्रभादेवी पाटील आहेत… त्यांच्या प्रवासात साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मचारीनी सौ. भाग्यश्रीताई पाटील, भगिनी मा. पद्माताई भोसले, तसेच कन्या सौ. अंकिताताई पाटील ठाकरे व जनसामान्यांचे नेतृत्व मा. राजवर्धन (दादा) पाटील व जीवाभावाचे असंख्य कार्यकर्ते व त्यांच्यावर निःसीम प्रेम करणारे इंदापूर तालुक्यातील मतदार आहेत.घरात राजकीय वारसा आणि जोडीला पाटीलकी यामुळे वडील कै. शहाजीराव (बापू) पाटील यांना आपला मुलगा गावातल्या शाळेत शिकला तर शिक्षकांची मेहरनजर त्याच्यावरती राहील याची चिंता वाटत होती म्हणून या दक्षपित्याने हर्षवर्धन पाटील साहेब यांना शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे येथे शिक्षणासाठी ठेवण्याचा निर्णय घेतला.श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत साहेबांचे शिक्षण सुरू झाले त्यांच्या या पुण्यातील वास्तव्यामुळे व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व बहुआयामी पद्धतीने घडत गेले. सर्वधर्मसमभावाचे संस्काराचे धडे याच वातावरणाने त्यांना बहाल केले..श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेबांवरती आजोबा कै. बाजीराव पाटील यांचे खूप प्रेम होते. हर्षवर्धनजी पुण्याला शिकतात याचे त्यांना भारी कौतुक असायचं नातवाला भेटण्यासाठी खास ते पुण्याला जात. शेवटच्या क्षणामध्ये मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आजोबा ऍडमिट होते. डॉक्टरांनी आता यांना परत घेऊन जा असे सांगितल्यावर परतीचा प्रवासात पुण्याला नातवाला भेटूनच गावी बावड्याला परतले. आजोबांचे स्वप्न होतं शिकून मोठं व्हायचं घराण्याचं नाव उज्वल करायचं ते त्यांनी पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले व घराण्याचं नाव व बावडा गावाचे नाव ओघाने इंदापूर तालुक्याच्या नावाची ओळख आपल्या नावाने करून दिली. महाराष्ट्रात इंदापूर हे नाव ‘हर्षवर्धन पाटील साहेब यांचे इंदापूर अशी ओळख आपल्या कार्यकुशल कर्तुत्वाने करून देणारे नेतृत्व आदरणीय साहेब आहेत.कधी दुःखाचा सारीपाट वाट्याला येतो ना अगदी तशीच घटना 1969 ला झाली 25 फेब्रुवारीला वडील कै. शहाजीराव (बापू) पाटील यांना देवाज्ञा झाल्याने मोठे दुःख वाट्याला आले. त्यावेळी हर्षवर्धन पाटील साहेब हे दहावीच्या बोर्डाची परीक्षा देणार होते. पितृछत्र हरपल्याचे दुःख होतेच परंतु वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी 2 मार्च 1969 पासून सुरू होणारी दहावीची परीक्षा त्यांनी दिली.वडिलांच्या नंतर काकी गेल्या आणि वडिलांचं वर्ष श्राद्ध होण्याच्या आतच धाकट्या चुलत्यांनाही देवाज्ञा झाली, वडीलधाऱ्या माणसांच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या दुःखाला बाजूला सारून हर्षवर्धन पाटील साहेब यांनी पार पाडल्या.कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी सुरू केलेल्या कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य शाखेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला व 1985 मध्ये प्रथम श्रेणीत पदवी संपादन केली. पुढे पुणे येथे आयएलएस विधी महाविद्यालयात प्रवेश घेऊन एलएलबी ची पदवी मिळवली.पण गावाकडच्या मातीची साद ऐकून त्यांनी पुढे गावाकडच्या सामान्य माणसाला शासन दरबारी न्याय मिळावा म्हणून अहोरात्र कष्ट घेतले.कर्मयोगी शंकररावजी पाटील हे इंदापूर तालुक्याच्या जनतेच्या हृदयी सिंहासनावरती विराजमान झालेल्या नेतृत्व चुलत्यांच्या रूपाने मा. श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना लाभले.त्यांच्या मुशीतच साहेबांचे नेतृत्व तयार झाले. 1952 पासून 1991पर्यंत सहा वेळा इंदापूर तालुका मतदार संघातून आमदार तर दोन वेळा बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून ते निवडून आले होते. या काळात पाटील परिवाराने अनेक पिढ्यांचा विश्वास मिळवला होता त्यामुळेच नेतृत्व करण्याची संधी मा. श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना जनता देत होती. घरातूनच मिळालेले राजकारणाचे बाळकडू दिलदार व्यक्तिमत्व प्रामाणिकपणा यांच्या बळावर साहेबांची पावले राजकारणाकडे वळाली व त्यातूनच समाजकार्याचा वसा आणि वारसा त्यांना मिळाला.वयाच्या 22 व्या वर्षी 1986 ला शिवामृत दूध उत्पादक संघ मर्या. अकलुज च्या संचालक पदी त्यांची निवड झाली.. 1992 मध्ये बावडा नरसिंहपुर जिल्हा परिषद मतदार संघातून विजय मिळवून लोक उपयोगी कामे केली. 1992 मध्ये पुणे जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी तिकीट न दिल्याने बंडखोरी करून विजय मिळवला. पुढे 1995 च्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले. मुंबईच्या टिळक भवनात 30 डिसेंबर 1994 ला 22 जण तिकीट मागण्यासाठी उत्सुक झाले. परंतु सर्वात तरुण आणि नवखे उमेदवार म्हणून बायोडाटा पाहण्याची आवश्यकता नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे इंदापुरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला गेला. पण समितीचा अहवाल दिल्लीला गेला आणि साहेबांचा पत्ता कापण्यात आला. या घटनेविषयी मा. साहेब आपल्या भाषणात सांगतात की, 14 जानेवारीला संक्रांत होती व त्यावर्षी ती आमच्या उमेदवारीवर आली. कर्मयोगी शंकररावजी पाटील दिल्लीवरून निराश होऊन परतले होते हजारोंच्या संख्येने त्यावेळी इंदापुरात आणि कार्यकर्ते दाखल झाले लादलेला निर्णय कार्यकर्त्यांना मान्य झाला नाही. जनता जनार्दनाचा आदेश मानत बंडखोरीने निवडणूक लढवण्याचा प्रसंग त्यांच्यावरती आला आणि 10 मार्च 1995 ला आपले नेते मा. श्री हर्षवर्धन जी पाटील साहेब दहा हजार मतांनी विजयी झाले. महाराष्ट्रात सेना भाजपा युती झाली आणि 45 अपक्ष आमदारांचे नेते मा. श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाने भरारी घेतली. व इंदापूर तालुक्याला साहेबांच्या रूपाने राज्यमंत्री मिळाला. थोड्याच काळात एक हुशार अभ्यासू मंत्री अशी त्यांची ख्याती दूरवर पसरली.फलोत्पादन आणि जलसंधारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी झाला. या काळात इंदापूर तालुक्याचा त्यांनी कायापालट करून टाकला. पुढील निवडणुकीत सर्वाधिक मताने ते निवडून येणारे ते सर्वात मोठे अपक्ष उमेदवार ठरले. पण खातेवाटपातील गोंधळ व त्या वेळचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचे झालेली अडचण लक्षात घेऊन त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल पी.सी अलेक्झांडर साहेबांकडे सुपूर्द केला. या घटनेबद्दल साहेब सांगतात, ” असा प्रसंग विरोधकांवर सुद्धा येऊ नये. ते ज्यावेळी इंदापुरात दाखल झाले त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी 30-35000 लोक जमले होते. पुढे दीड वर्षामध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांच्या मंत्रिमंडळात साहेबांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. 2002 मध्ये पणन व रोजगार हमी खात्याचे मंत्री म्हणून त्यांचा शपथविधी झाला.या काळात महाराष्ट्रभर दुष्काळाचे सावट पसरलेले होते. त्यावेळी साहेबांनी रोजगार हमी योजना व्यापक बनवली व महाराष्ट्रातील दहा ते बारा लाख जनतेला रोजगार मिळवून दिला. 2003 मध्ये मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या काळात पणन व रोजगार हमी खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. 2004 मध्ये तिसऱ्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून 24800 मतांनी साहेब निवडून आले विलासरावांनी आपल्या मंत्रिमंडळात त्यांना पणन रोजगार हमी महिला बालकल्याण व संसदीय कार्यमंत्री म्हणून अनोखी संधी त्यांना मिळाली. सलग पाच वर्ष संसदीय कार्यमंत्री पद भूषवून त्यांनी विक्रम प्रस्थापित केला त्याबद्दल तत्कालीन राष्ट्रपती महामहीम श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.त्यांचा इंदापूर तालुक्यातील 38 वर्षाचा कार्याचा आढावा थोडक्यात मांडणे शक्य नाही कारण अफाट कार्य या काळात त्यांच्या हातून घडले आहे. इंदापूर अर्बन बँकेची स्थापना, दूधगंगा दूध उत्पादक संघ, निरा भिमा साखर कारखान्याची उभारणी, इत्यादी महत्त्वपूर्ण संस्था त्यांच्या माध्यमातून सुरू झाल्या. कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील यांनी 18 मार्च 1960 रोजी स्थापन केली होती. बाजारपेठ विकसित करण्यासाठी बाजार समितीच्या कार्य कक्षा वाढवण्याचे काम मा श्री हर्षवर्धन जी पाटील साहेब यांनी केले. इंदापूर येथे आंतरराष्ट्रीय कांदा निर्यात केंद्र उभारले, तालुक्यातील वाढते डाळिंब उत्पादन लक्षात घेऊन डाळिंब मार्केटची ही उभारणी झाली. भिगवण निमगाव केतकी वालचंदनगर बावडा या ठिकाणी उप बाजार समित्यांची स्थापना भाऊंनी केली.अत्याधुनिकतेने नटलेल्या या बाजार समित्या तालुक्यातील केळी,कांदा भुईमुग शेंग गुळ खाण्याचे पान यासाठी प्रसिद्ध आहेत त्यामुळे तालुक्यातील उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातही त्यांच्या कार्याचा ठसा पहावयास मिळतो या तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी 30 पेक्षा अधिक माध्यमिक शाळा 300 अंगणवाड्या वस्तीशाळा आयटीआय च्या नवीन कोर्सेसला मंजुरी अद्यावत विद्यार्थी वसतिगृहे, तसेच कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात अनेक कोर्सेस सुरू केले व शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचालित पब्लिक स्कूल एस बी पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग व पॉलिटेक्निक तसेच फार्मसी कॉलेज सुरू करून शैक्षणिक संस्थांचे जाळे इंदापूर तालुक्यात उभा करण्याचे काम त्यांनी केले आहे. शिक्षणाच्या भगीरथाचा वारसा त्यांनी इंदापूर तालुक्यात निर्माण केला आहे.दुष्काळी तालुक्याला पाणी देणारे नेते म्हणूनही त्यांचा उल्लेख होतो. 1995 मध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना खडकवासला धरणातून इंदापूर तालुक्याला मिळणाऱ्या पाण्याचा वाटा वाढवून घेतला. निरा डाव्या कालव्याचे पाणी इंदापूर तालुक्याला मिळवण्यासाठी शासन दरबारी इंदापूरची वकील केली तालुक्यातील उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना उपसा सिंचन योजनेद्वारे मुबलक पाणी देण्यासाठी सतत प्रयत्न करणारे हर्षवर्धनजी पाटील साहेब आहेत. शेटफळ तलावाची उंची वाढवून अधिक क्षेत्र ओलीताखाली आणण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले आहे. नीरा नदीवर पीठेवाडी, बोरटवाडी, निरवांगी, निमसाखर, वालचंदनगर, चिखली व भीमा नदीवर टणू, नीरा- नरसिंहपुर येथे बंधाऱ्याची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच सुरवड वडापुरी अवसरी बेडसिंग बाभुळगाव गलांडवाडी नं २ भाटनिमगाव या भागात उपसा सिंचन योजनेचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गे लावले आहेत. निमगाव येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधून कृषी क्षेत्राला नंदनवन बनवण्याचे कार्य हर्षवर्धन पाटील साहेबांचेच. त्याचबरोबर तालुक्याला विज मिळावी म्हणून लोणी देवकर,काटी, घोलपवाडी, कालठण नंबर एक, बावडा, शिरसोडी, कांदलगाव, भाटनिमगाव, बाभूळगाव या ठिकाणी सबस्टेशन कारव्यान्वित करण्याचे श्रेय हे हर्षवर्धन पाटील साहेबांना जाते.अशाप्रकारे एक काम करणारा,लोकांचे दुःख दूर करणारा, लोक अपेक्षांना न्याय देणारा, कणखर नेता इंदापूर तालुक्याला लाभला आहे एक सुसंस्कृत नेता म्हणून यांचा परिचय महाराष्ट्राच्या राजकारणाला आहे सत्तेसाठी नाही तर समाजासाठी झटणारा नेता अशी त्यांची ख्याती सर्वदूर आहे. त्यांचा हा राजकीय आणि सामाजिक प्रवास महाकाव्यातील धिरोदात्त नायका प्रमाणे उज्वलतेकडे घेऊन जाणारा आहे. त्यांच्या या कार्याचा आढावा ६०व्या वाढदिवसानिमित्त घेत असताना कार्यकर्त्यांमध्ये नव संजीवनी भरेल असा मला विश्वास वाटतो. गोर गरीबांच्या आशीर्वादाचा संचय आणि कर्तुत्वाची उभारी मा. श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्याकडे आहे. इंदापूरचे ग्रामदैवत श्री. इंद्रेश्वराला या प्रसंगी प्रार्थना की आमच्या या नेत्याला उदंड आयुष्य लाभू दे. त्यांना वाढदिवसाच्या या शब्दरूपी कोटी कोटी शुभेच्छा!
माहिती संकलन: श्रीयश नलवडे, संपादक जनता एक्सप्रेस मराठी न्यूज..
Home Uncategorized कणखर आणि देखण नेतृत्व: चौफेर विकासाची उत्तुंग भरारी विकासरत्न हर्षवर्धनजी पाटील साहेब…