डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाच्या पॅकिंगवर धार्मिक पोस्टर डिझाईन करून जातीबद्दल धर्माची प्रसिद्धी निर्माण केली जाते अशा आशयाचे निवेदन काल मोहोळ पोलीस स्टेशन येथे इंदापूर शहर शिवसेनाप्रमुख अशोक देवकर, मोहोळ महिला आघाडीच्या प्रमुख पल्लवी गायकवाड, इंदापूर शहर उपप्रमुख अमोल राजगुरू यांनी दिले या निवेदनात असे म्हटले आहे की,भारत देश हा कृषिप्रधान देश समजला जातो. या भुमीतुन शेतकरी वर्ग कष्ट करून पिके घेत असतात. पंरतु याच पिकलेल्या मालावर शेटफळ ता. मोहोळ जि. सोलापूर येथील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाच्या पॅकिंग वर धार्मीक पोस्टर डिझाइन करून त्या जातीबद्दल प्रसिध्द धर्माची प्रसिध्दी निर्माण करण्यात येत आहे. यातील सामाजीक तेढ निर्माण होवुन विघातक कृत्य होवु शकते. व धर्माचा चुकीच्या पध्दतीने अनाधिकृतपणे प्रचार चालु आहे.तरी आपणास विनंती करीत आहे की अशा पॅकिंग वर कायमची बंदी घालण्यात यावी तसेच हे बॉक्स तयार करणारी कंपनी व डाळींब व्यापारी यांचेवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी ही विनंती अन्यथा अर्जाची दखल न घेतल्यास तिब्रू आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन काल मोहोळ पोलीस स्टेशनला देण्यात आले आता मोहोळ पोलीस स्टेशन याबाबत कशी कारवाई करते याकडे शिवसेनेचे लक्ष आहे.