मागील एक महिन्यापासून दिवंगत स्वातंत्र्य सैनिक कै. नारायणदास रामदास शहा यांचे चारित्र्य हनन करणाऱ्या पोस्ट सोशल मिडीयावर टाकल्या जात असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन इंदापूर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले आहे,फेसबुक- स्वच्छ इंदापूर शहर, इंदापूर नगरपरिषद महासंग्राम ह्या ग्रुप वरून त्यांच्या बद्दल अतिशय अपमानजनक, घाणेरडे, आक्षेपार्ह व चुकिच्या पोस्ट जाणीवपूर्वक समाज माध्यमांमध्ये पसरविल्या जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्यसैनिक कै.नारायणदास रामदास शहा यांनी आपल्या इंदापूर शहर व तालुक्यासाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकिय क्षेत्रामध्ये त्याकाळात दिलेले योगदान तालुक्यातील जनता कधिही विसरू शकत नाही हे सर्वांना ज्ञात आहे. त्यांच्यामुळे ज्या शिक्षण संस्था नावारुपाला आल्या त्यामुळे तालुक्यातील खेडोपाड्यातील हजारो गरीब मुलामुलींना शिक्षणाची दारे खुली झाली आणि त्यातून त्यांच्या पिढ्या प्रगती करू शकल्या. हजारो विद्यार्थी आज त्यांच्या क्षेत्रात उच्च पदावर काम करून निवृत्त झाल्या आहेत. त्यांच्या अतुलनीय कामगिरी बद्दल ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते त्यांना सन्मानीत करण्यात आले होते. त्यांची स्वच्छ व निष्कलंक कारकिर्द इंदापूर करांनी पाहिलेली आहे.
या पार्श्वभूमीवर काही नतद्रष्ट मंडळी विशिष्ट स्वार्थी हेतूने त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर चिखलफेक करण्याच्या उद्देशाने विकृत, खोडसाळ मजकूर सोशल मिडीयावर टाकत आहेत. आपण या प्रकरणाचा गांभिर्याने विचार करावा. सखोल तपास करून संबंधित ग्रुप कायम स्वरूपी बंदी आणावी व असा मजकूर टाकून सामाजिक स्थैर्य बिघडवू पाहणाऱ्या या समाजकंटकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
सोबत कै. नारायणदासजी शहा यांच्या बद्दलची तात्कालीन कागदपत्रे तचेस या संदर्भात त्यांच्या बद्दल व्हायरल केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट व मजकूर यांचा स्क्रीन शॉटस् आपल्या माहितीस्तव जोडत आहोत.या निवेदनावर इंदापूर नगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते पोपट शिंदे, माजी गटनेते गजानन गवळी, गणेश महाजन आरशद सय्यद, प्रमोद राऊत, सुनील तळेकर, अशोक चव्हाण, याच्यासह इतरच्याही सह्या आहेत.
Home Uncategorized दिवंगत स्वतंत्रसेनानी कै.नारायणदास रामदास शहा यांच्यावर जाणीवपूर्वक चिखलफेक करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध इंदापूर पोलीस...