👉 हर्षवर्धन पाटील यांचे माध्यमातून निमगाव केतकी ईदगाह सुशोभीकरणासाठी रु.15 लाखाचा निधी- राजवर्धन पाटील
👉 राजवर्धन पाटील यांची इफ्तार पार्टीला उपस्थिती.
इंदापूर : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे माध्यमातून निमगाव केतकी येथील मुस्लिम दफनभूमी शेड उभारणे व ईदगाहच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन विकास मंडळातून रु.15 लाखाचा निधी दिला जाईल, अशी घोषणा निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे अध्यक्ष, युवा नेते राजवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि.20) केली.
निमगाव केतकी येथे जनहित ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित रोजा इफ्तार पार्टीस राजवर्धन पाटील यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.
रमजान महिना मुस्लिम समाजामध्ये अतिशय पवित्र असून इफ्तार पार्टीच्या माध्यमातून सर्वधर्मियांमधील सामाजिक एकोपा मजबूत करण्याचे काम होत आहे, असे यावेळी बोलताना राजवर्धन पाटील यांनी नमूद केले.
प्रास्ताविक मुक्तार मुलाणी यांनी केले. यावेळी देवराज जाधव, किशोर पवार, मच्छिंद्र चांदणे, गोरख आदलिंग, सचिन चांदणे, सिकंदर मुलाणी, मुस्लिम ट्रस्टचे अध्यक्ष सचिन मुलाणी, उपाध्यक्ष जावेद मुलाणी, तुषार खराडे, मौलाना वारिस जमाली, जनहीत पतसंस्थेचे अध्यक्ष अस्लम मुलाणी, उपाध्यक्ष पंकज महाजन, सचिव असिफ शेख व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home Uncategorized इफ्तार पार्टीच्या माध्यमातून सर्वधर्मियांमधील सामाजिक एकोपा मजबूत करण्याचे काम होत आहे –...