22 गावांचा पाणी प्रश्नानंतर आता 9 गावांचा पाणी प्रश्न आला समोर,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील विरुद्ध राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पुन्हा येणार आमने-सामने.

इंदापूर: उजनी धरणातील पाण्यानंतर शेटफळ तलावातील पाणी प्रश्‍न पेटणार असून इंदापूर तालुक्यात सध्या एक पत्रक प्रचंड व्हायरल होत आहे. या पत्रकावर शेतकऱ्यांच्या पाण्याच्या संदर्भात मोठी आंदोलनाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भविष्यात काही दिवसात या पाण्यावरून मोठे आंदोलन उभे राहते की काय असा प्रश्न इंदापूर तालुक्यातील जनतेला पडला आहे.शेटफळ हवेली उचल पाणी परवानगी विरोधात आज (६ फेब्रुवारी) शेटफळ तलाव बचाव कृती समिती च्या वतीने बावडा येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.पूर्वीच्या १७ व आता ४८ अश्या एकूण ६५ जणांना शेटफळ तलावातून पाणी उचल परवाना दिला आहे. यामुळे तलावातील पाण्यावर १०० हून अधिक वर्ष अवलंबून असणाऱ्या शेटफळ हवेली,सुरवड,लाखेवाडी,भोंडणी, बावडा, निरनिमगाव,भगतवाडी या गावांना चारीने पाणी मिळणे दुरापास्त होणार अशी भीती शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे.यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित शेतकऱ्यांनी एकत्र येऊन भविष्यात रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यामधील पाण्यावरून संघर्ष अटळ असल्याचे दिसून येत आहे.पंडिततराव पाटील,अजित टिळेकर,महादेव घाडगे,दत्तात्रय घोगरे, विजय घोगरे,अशोकराव घोगरे,उदयसिह पाटील,मयुरसिंह पाटील,किरण पाटील,विजय गायकवाड,धैर्यशील पाटील, तुकाराम घोगरे,निलेश घोगरे,पवन घोगरे,सचिन सावंत,संतोष पाटील, इन्नुस मुलाणी, श्री.अमोल घोगरे इत्यादी शेतकऱ्याच्याा लढ्यासाठी उभे राहिलेले दिसून येत आहेत. त्यामुळे आता 22 गावाच्या पाणी प्रश्नानंतर यांना गावांचा पाणी प्रश्न पुन्हा भेटणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here