माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कोरोना पॉझिटिव्ह. स्वतः ट्विट करून दिली माहिती.लग्न समारंभास सहभागी लोकांच्या चाचण्या होणे गरजेचे.

इंदापूर: राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला असून कालच हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा ताज हॉटेलमध्ये विवाह संपन्न झाला आहे .या विवाहामध्ये  वर वधूना शुभाशीर्वाद देण्यासाठी अनेक प्रतिष्ठित मंंडळी उपस्थित होते.यापैकी सुप्रिया सुळे यादेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या.या विवाह समारंभास काही विदेशी मित्रमंडळीही सहभागी असल्याचे फोटो पाहायला मिळाले असल्याने आता जे लोक विवाह मध्ये सहभागी होते त्या सर्व लोकांच्या चाचण्या करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या  चार ते पाच दिवसापासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे आपल्या कन्या अंकिता पाटील व निहार ठाकरे यांच्या विवाहाच्या तयारीनिमित्त मुंबईतच होते. कालच विवाह संपन्न झालेला होता.हर्षवर्धन पाटील यांनी कोरोनाची चाचणी केली व त्यात ते पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे आता 4 जानेवारीला होणाऱ्या स्नेहभोजन कार्यक्रम होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत चालले असून रोजच्या रोज आकडेवारीमध्ये वाढीव बदल होत आहे त्यामुळे आता सर्व स्तरातील लोकांनी याबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here