होय..❗आता परळी वैजनाथ तालुक्यातील बेरोजगारांसाठी खात्रीशीर नोकरीची संधी, ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू…वाचा सविस्तर…

परळी वैजनाथ तालुक्यातील बेरोजगार मुला-मुलींसाठी आनंदाची बातमी-वैद्यकीय क्षेत्रात शंभर टक्के नोकरीची हमी देणारी ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज परळी वैजनाथ येथे सुरू …
परळी: प्रतिमा बहुउद्देशिय सेवाभावी संस्था संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज परळी वैजनाथ या ठिकाणी सध्या प्रवेश चालू झाला असून बेरोजगार मुला मुलींसाठी वैद्यकीय क्षेत्रात शंभर टक्के नोकरीची हमी या संस्थेमार्फत देण्यात आली असून इच्छुकांनी त्वरित या संस्थेमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.या संस्थेमार्फत बेरोजगार लोकांना शंभर टक्के शासकीय , निमशासकीय परदेशात महानगरपालिकेमध्ये, नगरपालिका, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय इत्यादी ठिकाणी नोकरीची संधी मिळू शकते त्याचप्रमाणे या संस्थेमध्ये अनुभवी तज्ञ शिक्षकांचे वैयक्तिक मार्गदर्शक असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट असणार आहे.ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल साठी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलची सोय करून बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना राहण्याची व मेसची सोय केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीस्कर असे झाले आहे.
डिप्लोमा इन मेडिकल लायबोरिटरी टेक्नॉलॉजी(DMLT), डायलिसिस टेक्नॉलॉजी अँड नर्सिंग मॅनेजमेंट,आय.सी.यू .टेक्निशियन, रेडिओलॉजी टेक्निशियन,कार्डियाक केअर टेक्निशियन, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन अशा प्रकारचे 2 वर्षाचे डिप्लोमा कोर्सेस चालू झाले असून यामध्ये बारावी पास झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया चालू आहे. त्याचप्रमाणे H.A असिस्टंट साठी दहावी पास /नापास विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्सेस प्रवेश प्रक्रिया सुद्धा चालू आहे.प्रतिमा बहुउद्देशिय सेवाभावी संस्था संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज हे परळी (वै)शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जनलक्ष्मी सर्जिकल हॉस्पीटल, वरचा मजला, डूबे पेट्रोल पंपासमोर, छत्रपति शिवाजी महाराज चौक, परळी वैजनाथ येथे चालू झाले असून यामध्ये गरजूंनी सहभाग घेऊन आपले भवितव्य उज्वल करावे असे या संस्थेच्या व्यवस्थापकांकडून आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रिया व इतर माहितीसाठी संपर्क क्रमांक 8329042838 ,9370289055 ,9172872889 , 9519030842.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here