हिंगणी येथे शिवजयंती निमित्त र्कितन व व्याख्यानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न….

हिंगणी ता. करमाळा: दिनांक १९ फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवशाही फाऊंडेशन व शिवशाही शेतकरी समूह यांच्या संयुक्त विध्यमाने हिंगणी येथे सकाळी ९ वाजता भैरवनाथ मंदिरासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी अनेक शालेय मुलांनी भाषणे केली. तसेच बाल व्याख्याती कु. संस्कृती सूर्यकांत राणे रा. इंदापूर हिचे प्रजादक्ष राजा शिवछत्रपती या विषयावर अतिशय सुंदर असे व्याख्यान झाले.यानंतर सायंकाळी ७ ते १० यावेळेमध्ये युवा कीर्तनकार, शिवव्याख्याते ह.भ. प प्रकाश महाराज साठे यांचे शिवचरित्रपर समाज प्रबोधन व विनोदी कीर्तन झाले.
त्यानंतर सौ. दिपालिताई खाटमोडे यांनी सूंदर पाळणा गायन केले. या कार्यक्रमासाठी मा. सरपंच श्री. हनुमंत पाटील, मा श्री. आबासो पाटील(पोलीस पाटील) श्री.भानुदास बाबर ( उपसरपंच) मा. श्री संजय बाबर, मा.श्री. भरत जाधव(मेजर),मा श्री. नवनाथ गायकवाड सर, मा श्री. सुखदेव धनवडे सर उपस्थित होते. शिवशाही फाऊंडेशन मार्फत आयोजित शिवजन्मोत्सव कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिकांची चांगली उपस्थित होती. तसेच सर्वांनी शिवशाही फाऊंडेशन च्या कार्याची प्रशंसा करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिवशाही फाऊंडेशन आयोजित कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी फाऊंडेशन अध्यक्ष औदुंबर बाबर उपाध्यक्ष नितीन पाटील सचिव नवनाथ बाबर तसेच सर्व शिवशाही फाऊंडेशन चे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here