भिगवण: शिवजयंतीनिमित्त येथील रोटरी क्लब भिगवन आणि डॉक्टर्स असोसिएशन भिगवन यांच्या वतीने दि.१५ रोजी सकाळी 10:वा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदानाला सुरुवात करण्यात आली या शिबिरामध्ये ५७ बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.
रक्ताचा तुटवडा भासू नये आणि गरजेच्या वेळेस मागेल त्याला रक्त उपलब्ध व्हावे याकरीता या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे रोटरीचे अध्यक्ष संजय खाडे यांनी सांगितले, कोरोनाच्या काळात निर्माण होणारा रक्ताचा तुटवडा पाहता रक्तदानाचा उपक्रम महत्त्वाचा ठरतो. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने अनेक जणांना प्राण गमवावे लागतात. त्यामुळे रक्तदान ही काळाची गरज आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक अशोक शिंदे यांना रक्तदान करता येणार नाही म्हणून त्यांनी जे रक्तदान करण्यासाठी येथील त्यांच्यासाठी अल्पोपहाराचे नियोजन केल तर ,सौ कांता सोपान धोंडे यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस रक्तदान करून साजरा केला यावेळी रोटीचे माजी अध्यक्ष रियाज शेख,संपत बंडगर,संजय चौधरी , नामदेव कुदळे, महेश शेंडगे, संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत,उपाध्यक्ष औदुंबर हुलगे, खजिनदार प्रदीप ताटे, प्रवीण वाघ, संतोष सवाणे, किरण रायसोनी,प्रा.डॉ.प्रशांत चवरे, डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डॉक्टर संकेत मोरे, डॉ.एल.जी.शहा डॉक्टर कोठारी, डॉ गांधी, डॉ.अमोल खानावरे, डॉ शैलेश दोशी, डॉ वेदपाठक डॉ.अमित खानावरे,डॉ.रामभाऊ हगारे, डॉ नगरे प्रा.तुषार क्षीरसागर, योगेश चव्हाण, डॉ.भारत भरणे,डॉ.महेश गाढवे, डॉ.ज्ञानेश रेणूकर, डॉ.त्र्यंबक काळे, डॉ.मोरे डॉ माने डॉ थोरात,सुनील धवडे, रोहित बंडगर, सनी शेलार, नवनाथ सुतार, संपत चौधरी, अर्जून तोडकर, अल्ताफ शेख, केशव भापकर,तसेच रोटरी क्लब आणि डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.