व्वा..अभिमानास्पद..! वडिलांनी शिपाई म्हणून काम केलेल्या कार्यालयातच मुलाचा तहसीलदार म्हणून पदभार सांभाळण्याचा होण्याचा योगायोग

सांगोला तहसील कार्यालयाचे तहसीलदार अभिजीत सावर्डे यांची उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झाल्याने त्यांची बदली झालेली आहे. या त्यांच्या रिक्त झालेल्या जागेत तहसीलदार पदी संजय खरतडे यांनी नुकतेच पदभार सांभाळला आहे.आणि यामुळेच कधी नव्हे असा एक योगायोग पहावयाला मिळाला आहे. संजय खरतडे यांचे वडील याच कार्यालयात शिपाई होते त्याच कार्यालयात मुलगा संजय खरतडे यांनी आता तहसीलदार म्हणून पदभार सांभाळला आहे.सोमवार (ता. ५) रोजी संजय खडतरे पदभार स्वीकारला. यावेळी नायब तहसिलदार किशोर बडवे, हरिभाऊ जाधव, विकास माळी यांचेसह महसूल आधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.नूतन तहसिलदार संजय खडतरे सांगोला येथीलच रहिवासी आहेत. तहसीलदार म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर ते थेट सांगोल्यातच रुजू झाले आहेत. वडील ज्या तहसील कार्यालयात शिपाई म्हणून काम करत होते. त्याच कार्यालयात त्यांनी तहसीलदार म्हणून रुजू होऊन कामास सुरुवात केली आहे.1986 साली तहसील कार्यालय शिपाई असणारे त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर 1992 मध्ये ते त्याच कार्यालयात क्लार्क म्हणून अनुकंपाखाली रुजू झाले होते. या अगोदर खडतरे यांनी सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, येथे महसूल क्लार्क म्हणून उत्कृष्ठ काम केले आहे. २०१६ साली त्यांची मावळ (जि. पुणे) येथील प्रांत कार्यालयात नायब तहसिलदार म्हणून पदोन्नती झाली. त्याठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.सांगोला येथे पदोन्नतीवर तहसिलदार म्हणून नेमणूक झाली आहे. सोमवार (ता. ५) रोजी सांगोला तहसिलदार म्हणून पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन सामान्य नागरिकांना कोणत्याही विभागात त्रास होणार नाही यासाठी नवी रूपरेखाच ठरवून दिली. वेळेत कामे न झाल्यास किंवा कामकाजात हायगय करणाऱ्या कर्मचाऱ्या मी पाठीशी घालणार नसल्याचे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. तसेच पदभार स्वीकारल्यानंतर नूतन तहसीलदार संजय खडतरे यांनी सांगोला तहसील कार्यालयाचे माझे अत्यंत भावनिक नाते असल्याचे सांगितले. माझे वडील याच कार्यालयात शिपाई होते. मी ही काही काळ येथे काम केले आहे. त्याच कार्यालयात मी आज तहसीलदार म्हणून रुजू झाल्यावर माझे ह्रदय भरून आले आहे. अशा भावना व्यक्त केल्या.पदोन्नतीने सांगोल्यातीलच रहिवासी असलेले नूतन तहसीलदार संजय खडतरे यांना निवृत्ती होण्यासाठी फक्त तीन महिन्याचा अवधी राहिला आहे. त्यामुळे आपल्या शहरात तहसीलदार म्हणून काम करण्यासाठी त्यांना तीन महिनेच मिळणार आहेत. संजय खरतडे यांनी पदभार सांभाळल्यानंतर सांगोला तालुक्यातच नव्हे तर परिसरातील सर्व तालुक्यात त्यांच्या या नियुक्तीची चर्चा रंगली होती.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here