इंदापुर ता.प्रतिनिधी:सचिन शिंदे
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा निमगांव केतकी मध्ये दि.१ जुलै रोजी येणार असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाकडून पालखीत सहभागी होणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नयेत म्हणून विविध उपाय योजना करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर चालू आहे परंतु गेल्या दीड वर्षापासून वारंवार मागणी करून देखील ही निमगाव केतकी येथील वार्ड क्र. ३ मध्ये ग्रामपंचायत प्रशासना कडून मुरुमीकरण तसेच स्ट्रीट लाईट बसवण्याचे काम होत नसल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्या रिना सुभाष भोंग यांनी केला आहे. पालखी काळात गावाबरोबरच वाड्या-वस्तीवर देखील पालखी बरोबर चालणाऱ्या दिंड्या मुक्कामास असतात. रस्त्याला पडलेले खड्डे त्याच प्रमाणे रात्रीच्या अंधारामुळे वारकऱ्यांना गैरसोय होत असते.वारंवार मागणी करूनही वाड्या वस्तीवरील लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाकडून चालू असल्याने मा. उपसरपंच तुषार जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मा. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे ॲड. सुभाष भोंग यांनी सांगितले.