राष्ट्रवादीचे मुलुख मैदानी तोफ धनंजय मुंडे आज वालचंदनगर दौऱ्यावर, भरणे मामांच्या माध्यमातून झालेल्या 11 कोटी रु.च्या विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन.

इंदापुर: राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात विविध विकास कामांचा धडाका जोरात चालू असून गेल्या आठवड्यामध्ये कौठळी व काल निरवांगी येथील करोडो रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन केल्यानंतर आज इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याहस्ते व राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.१८) ११ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न होणार असून सायंकाळी ५.३० वाजता वालचंदनगर येथे जाहीर सभा होणार आहे.सदरील कार्यक्रमाच्या भूमिपूजन व उद्घाटन समारंभा प्रसंगी कामगार नेते शिवाजीराव खटकाळे यांचा जाहीर नागरी सत्कार होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील,जिल्हा परिषद सदस्या वैशालीताई पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,पंचायत समिती सदस्या शैलेजाताई फडतरे, कळंबच्या सरपंच विद्याताई अतुल सावंत, रणगांवच्या सरपंच सुषमा राहुल रणमोडे, कळंबचे उपसरपंच लक्ष्मण पालवे, रणगांवचे उपसरपंच प्रदीप पवार हे असणार आहेत.
सदरील निधीच्या माध्यमातून कळंब ते नातेपुते रस्ता, वालचंदनगर ते रणगांव रस्ता तसेच सामाजिक न्याय विभाग व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करोडो रुपयांची विविध विकास कामे होणार आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here