नववर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वानंद प्रतिष्ठानच्या वतीने हडपसर येथे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन : ह भ प मच्छिंद्र महाराज लांडगे

👉 मुख्यमंत्री वैद्यकीय निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचा पुरस्काराने सन्मान होणार.
हडपसर: स्वानंद अध्यात्मिक प्रतिष्ठाण ट्रस्ट च्या वतीने १ जानेवारी २०२३ रोजी प्रतिष्ठानच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त हडपसर येथे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक व स्वानंद प्रतिष्ठान चे अध्यक्ष ह. भ. प. मच्छिंद्र महाराज लांडगे यांनी दिली.
यावेळी होणाऱ्या समारंभात मुख्यमंत्री वैद्यकीय निधी कक्षप्रमुख व विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नवनाथ लांडगे यांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.
आरोग्य शिबिर व समारंभ स्वानंद आध्यात्मिक प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने हडपसर येथे साडेसतरा नळी रोड
सर्व्हे नं २०६,दत्तनगर,गोसावी वस्ती येथे स्वानंद संस्थेने उभारलेल्या स्वानंद क्लिनिक या हॉस्पिटलमध्ये हे रक्तदान व आरोग्य शिबिर रविवारी (दिनांक १ जानेवारी 2023) रोजी सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत होणार आहे.
समारंभास व आरोग्य शिबीरास आमदार चेतन तुपे पाटील, माजी आमदार योगेश टिळेकर, पुणे मनपाचे नगरसेवक मारुती आबा तुपे, नगरसेवक प्रमोद भानगिरे, साडे सतरा नळी चे माजी उपसरपंच रुपेश तुपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भूषण तुपे, पंचायत समितीचे मा. उपसभापती संदीप तुपे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या शिबिर मध्ये मोफत आरोग्य तपासणी,ईसीजी तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, रक्तातील साखर व कोलेस्ट्रॉल आदी तपासणी करण्यात येणार आहे.आरोग्य शिबिर हे पूर्णपणे मोफत आहे.
राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याचे दिसत आहे त्यामुळे रक्तदानासारख्या महान कार्यास आपण प्राधान्य देऊन रक्तदान करण्यास त्याचप्रमाणे आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यास उपस्थित राहावे, ज्यांना रक्तदान करायचे आहे, त्यांनी मोबाईल क्रमांक 8793564149 या नंबर वर संपर्क करावा, असे आवाहन ह. भ. प. मच्छिंद्र महाराज लांडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here