योग्य मोबदला दिल्यास निमगाव केतकी बाह्यवळणास जमिनी देऊ.- काही शेतकऱ्यांचे मत

श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग पुणे पाटस ते पंढरपूर या चौपदरीकरणाचे काम हे प्रगतीपथावर चालू आहे श्री संत तुकाराम पालखी महामार्ग मौजे निमगाव किती येथील बाह्यवळण मार्ग शेतकऱ्यांच्या शेतातून जाणार असल्याचे संकेत दिसून येत असल्याने काही राजकारणी शेतकऱ्यांनी तो पालखी महामार्ग आपल्या शेतातून न जाता गावातून जावा याकरता धरणे आंदोलनाला व उपोषणाला बसलेले आहेत.
काल प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे मत जाणून घेतली असता वस्तुस्थिती ही फार वेगळी आहे आम्हाला जर शासनाने आमच्या शेत जमिनीला योग्य मोबदला दिला तर बाह्यवळण स आमच्या जमिनी देऊ असे शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेतले परंतु काही राजकारणी हितचिंतक आमची दिशाभूल करत आहेत जर निमगाव केतकी गावातून हा मार्ग गेला तर अनेकांचे प्रपंच धुळीस मिळतील निमगाव केतकी बाजारपेठ ची तालुक्यातील अत्यंत मोठी बाजारपेठ आहे निमगाव कितीही बाजार पेठ तालुक्यातील अत्यंत मोठी बाजारपेठ आहे या गावांमध्ये अनेक छोटे मोठे उद्योग धंदे करुन आपला उदरनिर्वाह करून जीवन जगत आहेत जर हा महामार्ग या गावातून गेला तरी यांच्या वरती उपासमारीची वेळ येणार आहे. राज्य पत्रानुसार तयार झालेला हा मार्ग बाह्य मार्ग आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या शेतजमिनीला जर योग्य मोबदला शासनाने दिला तर बाह्य मार्गाचा आमच्या जमिनी देऊ असे खालील शेतकऱ्यांनी लेखी स्वरुपात संमती दिली आहे.
या शेतकऱ्यांमध्ये दत्तू आदलिंग ,धनाजी आदलिंग, शिवाजी भोंग , गणपत बनकर, रंगनाथ भोंग ,अशोक बनकर, दत्तू बनकर, जनार्दन बनकर ,साळुबाई बनकर, संगीता भोंग, सुभाष बनकर, निलेश बनकर, शिवदास बनकर, विनोद भोंग, नितीन भोंग ,दिलीप बनकर, या शेतकऱ्यांचं म्हणणं असा आहे जर बाहेर गेले तर अनेक व्यवसाय तेथे उभा राहतील यासाठी आमच्या शेतजमिनीला जर योग्य मोबदला दिला तर शेत जमिनी देण्यास तयार आहोत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here