मुख्यमंत्री एकनाथ शिंदें गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्य बाण चिन्ह देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक व स्वागतार्ह – हर्षवर्धन पाटील

इंदापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदें गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्य बाण चिन्ह देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक व स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
शिवसेना ही आमची आहे अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम पासून घेतली होती. त्यांच्या या भूमिकेवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शिक्कामोर्तब केले. भाजप-शिवसेना युती ही नैसर्गिक युती आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालील युतीचे सरकार आता अधिक भक्कमपणे व वेगाने राज्यातील जनतेच्या हितासाठी काम करेल, त्याचे चांगले परिणाम येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दिसून येतील, असे मत यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here