मा.राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली काटकसरीने संस्थेचे हित जपत काम करणार- नूतन सभापती दत्तात्रय ठोंबरे.

इंदापूर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात नावाजलेल्या इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेच्या सभापती पदी दत्तात्रय ठोंबरे आणि उपसभापती सतीश गावडे यांची आज बिनविरोध करण्यात आली.सहाय्यक निंबधक कार्यालयाच्या पीठासीन अधिकारी यांनी निवड प्रक्रिया राबविली.
स्वाभिमानी शिक्षक परिवाराच्या कोअरकमिटीने ठरविल्याप्रमाणे सहा महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे मावळते सभापती अदिनाथ धायगुडे आणि उपसभापती रामचंद्र शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवड करण्यात आली. यावेळी मावळते सभापती व उपसभापती यांनी नूतन सभापती आणि नूतन उपसभापती यांचे अभिनंदन केले.नवनियुक्त सभापती दत्तात्रय ठोंबरे यांनी २० वर्षे संचालक म्हणून काम पाहिले आहे. दोन वर्षे उपसभापती म्हणून काम पाहिले होते.निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना ठोबरे म्हणाले संस्था आदरणीय मा.राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतराहील.सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून पारदर्शी आणि काटकसरीचा कारभार केला जाईल.सर्व संचालक मंडळ आणि चारही शिक्षक संघटनांना विश्वासात घेऊन संस्था प्रगतीकडे घेऊन जाण्याचा संकल्प करत आहे असे यावेळी मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे नवनियुक्त उपसभापती सतीश गावडे यांनी निवडीबद्दल उपस्थित पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.यावेळी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब नरूटे, इब्टाचे तालुकाध्यक्ष सहदेव शिंदे,कास्ट्राईबचे तालुकाध्यक्ष व संचालक सुहास मोरे ,शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष सतीश शिंदे, दत्तात्रय तोरसकर, सुरेश पांढरे ,उद्धव गरगडे ,चंद्रकांत गोरे ,मारूती सुपूते,रतिलाल कुचेकर,रविंद्र सातव , सुरेश साळूंके, बाळासाहेब महानवर ,आत्माराम मारकड ,संजय दगडे ,महावीर देवडे, राजकुमार तरंगे ,बबन सुरवसे ,प्रताप भगत , रमेश शेलार ,पांडूळे, अंबादास नरूटे, महेश थंबद ,सुर्यकांत गुंड, संतोष घोडके, सिद्धेश्वर गणगले ,जमीर शेख, दिनेश काळे , शामसुंदर माने, गणेशसिंह मोरे, महेश साळूंके,विद्यासागर गायकवाड, अरुण कांबळे,उज्वल कुमार सुतार आणि सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here