माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली शेटफळ हवेली येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध.

शेटफळ हवेली येथे 1992 साली स्थापन झालेल्या भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये संतोष बनकर यांची चेअरमन पदी तर बाळासाहेब जाधव यांची व्हा.चेअरमन पदी निवड करण्यात आली.
भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटीचे एकूण 466 सभासद असून त्यामध्ये 436 एवढे मतदानास पात्र सभासद आहेत.संस्थेचे 340 सभासद कर्जदार असून 300 सभासद नियमित परतफेड करणारे कर्जदार आहेत. दरवर्षी चार कोटी पेक्षा जास्त कर्जवाटप करणारी ही संस्था आहे. भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटीचे पॅनल प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब करगळ यांच्या नेतृत्वाखाली व माजी राज्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली 13 सभासदांनी अर्ज दाखल केले होता.परंतु बाळासाहेब करगळ यांच्या पॅनलला कोणत्याही प्रकारचे विरोधी अर्ज न दाखल झाल्याने हे 13 सभासद निवडीस पात्र ठरले.त्यानंतर माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचनेनुसार चेअरमन पदी संतोष बनकर व व्हा.चेअरमन पदी बाळासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली. नुकतेच माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या तेरा बिनविरोध विजयी झालेल्या सदस्यांना घरी बोलवून त्यांचा सन्मान केला व “भविष्यात कोणत्याही प्रकारकची मदत लागल्यास मी आपल्यासाठी तत्पर राहील”.अशी ही ग्वाही दिली.चेअरमन पदी निवड झाल्यानंतर संतोष बनकर यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना सांगितले की,” मी या मिळालेल्या संधीचा शेतकऱ्यांसाठी व त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशील राहील व पारदर्शक कारभारातून संस्थेचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न करीन. त्याचबरोबर मला चेअरमन पदी निवड केल्याबद्दल भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटीचे पॅनल प्रमुख बाळासाहेब करगळ व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचेही आभार मानतो”अशा भावनाही यावेळी नूतन चेअरमन संतोष बनकर यांनी व्यक्त केल्या. ही सर्व निवडणूक प्रक्रिया अध्यासी अधिकारी पो.वि.हराळ, संस्थेचे सचिव विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांची यादी खालील प्रमाणे:
१.बनकर संतोष धनाजी- चेअरमन
२.जाधव बाळासो तुकाराम- व्हॉइस चेअरमन
३.सावंत भाऊराव लक्ष्मण- सदस्य
४.नवले गणेश विठठल- सदस्य
५.पवार प्रथमेश रमेश- सदस्य
६.शिंदे सुधिर नारायण- सदस्य
७.नरबट पांडुरंग सोमा- सदस्य
८.सोलनकर प्रकाश वेताळा- सदस्य
९.आरडे नारायण मारुती- सदस्य
१०.शिंदे संध्या अतुल- सदस्य
११.शिंदे गौरी शिरिष- सदस्य
१२.जाधव अजित दिपक- सदस्य
१३.करगळ स्वप्नील बाळासो- सदस्य

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here