महाराष्ट्र धोबी(परीट) समाज आरक्षण समन्वय समितीच्या लढ्याला यश…, धोबी समाजाच्या आरक्षणाची फाईल राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे रवाना…

मुंबई (विशेष प्रतिनिधी- संदिप आढाव)

धोबी समाजाचे (पूर्वीचे) हिरावून घेतलेले एस सी चे आरक्षण पूर्ववत लागू करनेकामी आपल्या हक्काचे आरक्षण आपल्याला मिळावे याकरिता समाजाचे मुंबई येथील नेते स्व.रमाकांतशेठ_कदम यांनी धोबी समाजाच्या सर्व संघटनांना_एकत्र करून आरक्षण समिती स्थापन केली. आणि महाराष्ट्र धोबी(परीट) समाज आरक्षण_समन्वय समिती च्या वतीने वेळोवेळी केलेली आंदोलने व शासनदरबारी – मुंबई मंत्रालयामध्ये केलेल्या पाठपुराव्याचा_परिणाम होऊन धोबी समाजाच्या आरक्षणाची फाईल दिल्ली केंद्र सरकारकडे गेली…, पुन्हा केंद्र सरकारने धोबी समाजाची माहिती राज्य सरकारला प्र-पत्रामध्ये मागवली आणि या गोष्टीचा पाठपुरावा मुंबई मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागामध्ये आरक्षण समन्वय समितीचे पदाधिकारी वारंवार करत होते… शुक्रवार दि. २२ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने धोबी समाजाची जी माहिती राज्य सरकारला मागितली होती ती माहिती राज्य सरकारने केंद्राला पाठवली आहे. आणि या गोष्टीची खातरजमा करण्यासाठी परवा दि. २५ ऑक्टोबर २०२१ रोजी महाराष्ट्र धोबी (परीट) समाज आरक्षण समन्वय समितीचे पदाधिकारी यांमध्ये समितीचे प्रमुख आशिष रमाकांतशेठ_कदम, समितीचे अध्यक्ष डी.डी.सोनटक्के, मुख्य महासचिव अनिल शिंदे, कार्यालयीन सचिव संतोष_बंधू_सवतीरकर, कोषाध्यक्ष मुरलीधरजी_शिंदे, ज्येष्ठ मार्गदर्शक रुकेश_मोतीकर, प्रदेश उपाध्यक्ष सुनील शिंदे, समिती सदस्यांपैकी भैय्याजी रोहनकर, कुमार शिंदे, उज्वलाताई_कामरकर, राजन लोणकर इत्यादी पदाधिकारी मुंबई मंत्रालयामध्ये गेले धोबी समाजाच्या आरक्षणाची फाईल केंद्र सरकारकडे गेली आहे की नाही ते पाहिले…
समाजाच्या आरक्षणाची फाईल केंद्राकडे गेली असून आता राज्य शासनाची लढाई संपलेली असून महाराष्ट्र धोबी (परीट) समाज आरक्षण समन्वय समितीच्या माध्यमातून अशाच प्रकारची पुढची दिल्लीची लढाई लढू व पाठपुरावा करू असे आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष डी. डी.सोनटक्के यांनी सांगितले आहे…

– -संदिप_आढाव – राज्य प्रसिद्धीप्रमुख…



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here