पुणे जिल्हा एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचाच्या वतीने एमबीबीएस होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन वेबिनार..

पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक सेवा मंचाच्या वतीने एम .बी .बी. एस MBBS प्रवेश प्रक्रिया 2021-22 साठी ऑनलाइन मार्गदर्शन वेबिनार चे आयोजन दिनांक 28 ऑक्टोबर 2021 रोजी सायं. 6 वाजता करण्यात आले आहे.
डॉक्टर होण्याचं स्वप्न असणाऱ्या परंतु नीट परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांनी निराश न होता या मेडिकल प्रवेश प्रक्रिये करीता आयोजित केलेल्या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा..
भारतातील आणि परदेशातील नामांकित सरकारी व खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मोफत प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर नीरज कुमार शाह (आत्मिय एज्युकेशन, पुणे) हे ऑनलाइन वेबिनार च्या माध्यमातून करणार आहेत.एम.बी.बी.एस प्रवेश प्रक्रिये संदर्भात मोफत मार्गदर्शन मिळण्यासाठी नाव नोंदणी करा  https://forms.gle/8sxPKoMT2tXVgdFX7 ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रमाची लिंक कार्यक्रमा अगोदर पाठवण्यात येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क.
श्रीम. सुप्रिया गेनबा आगवणे
अध्यक्ष महिला आघाडी एकल शिक्षक सेवा मंच. शाखा-इंदापूर.
मो नं-8669961989



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here