इंदापुर: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या बारामती जिल्ह्यातर्फे इंदापूर इंदापूर शाखेमध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शंभर फूट तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजनाने करण्यात आली.खडकपुरा येथून तिरंगा पदयात्री सुरुवात करण्यात आली. हि तिरंगा पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेन बाजार पेठ या मार्गाने मार्गस्थ होऊन नेहरू चौकात समारोप करण्यात आला.
भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी नागरिक सहभागी झाले प्रत्येक वयाचा नागरिक या यात्रेत सहभागी असताना महिलांचा सहभाग लक्षवेधी होता या तिरंगा पदयात्रेत पुणे विभाग संघटनमंत्री रोहित राऊत, जिल्हा संयोजक ओंकार कुरुमकर, सहसंयोजक अजय चव्हाण, तालुकाप्रमुख भरत आसबे, इंदापूर शहर मंत्री अवधूत बाचल, सहमंत्री ऋतुजा कदम, सहमंत्री स्वप्नील भंडलकर, आंदोलन प्रमुख सुरज खामगळ, नीलकंठ काशीद इ.अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.राष्ट्रगीताने तिरंगा पदयात्रेची सांगता झाली.