👉 युवा वॉरियर्स चं जाळ राज्यभर निर्माण करणार पक्ष श्रेष्टीनी टाकलेला विश्वास सार्थकी लावणार- दिपक काटे
इंदापूर:भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी दिपक आण्णा काटे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काटे यांच्या नियुक्ती घोषणा केली होती. याबाबत निवडीचे पत्र भाजप चे सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या हस्ते दिपक काटे यांना देण्यात आले. अशी माहिती दिपक काटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना काटे म्हणाले की पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे. माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातील युवकांस पक्षाने खूप मोठी जबादारी दिली आहे. माझ्यावर युवा वॉरियर्स च्या पश्चिम महराष्ट्राच्या सहसंयोजक पदाची जबाबदारी दिली आहे.त्यामुळे युवा वॉरियर्स च्या शाखांचं जाळ करणार आहे. येणाऱ्या काळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राम शिंदे, सरचिटणीस विक्रांत दादा पाटील, सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील,यांच्या मार्गदर्शनखाली सर्व सामान्य कार्यकर्त्याबरोबर कामं करणार असल्याचे दिपक काटे यांनी सांगितले..