करमाळा प्रतिनिधी – (देवा कदम )
भारत देश हा जगातील एकमेव असा देश आहे की या ठिकाणी सर्व धर्माचे लोक राहतात. व प्रत्येकाच्या आवडीनिवडी राहणीमान व सर्व धर्माची शिकवण वेगवेगळी आहे.प्रत्येक जण आपल्या धर्माच्या पद्धतीने वागतो आणि वागण्याचा प्रयत्न करतो.धर्माची शिकवण ही प्रत्येक जण पाळतो व त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो.परंतु त्या वागण्याने जर इतर समाजाला हानी पोहोचत असेल तर अशा समाजातील त्रास होणाऱ्या या गोष्टींना विरोध करण्यासाठी भारतामध्ये न्यायपालिका आहेत.त्याचप्रमाणे भारत देश हा लोकशाही प्रमाणे चालणारा देश आहे. त्या ठिकाणी प्रत्येकाला आपले मत,विचार ,स्वातंत्र्य व धर्माभिमान पाळण्याचा अधिकार संविधानाने बहाल केलेला आहे.त्याचप्रमाणे भारतामध्ये हजारो समाज राहतात त्या प्रत्येक समाजामध्ये त्या समाजाची प्रगती उन्नती व तो समाज सन्मार्गावर चालावा , व सन्मानाने वागावां यासाठी काही विशिष्ट व्यक्तींनी त्या त्या समाजासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. व त्या समाजातील महा पुरुषांविषयी तो समाज भावपूर्ण असा आदरही बाळगतो. व त्यांच्या आचार विचारांवर त्यांची प्रगती करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो.यातूनच भारतामध्ये सर्वधर्मसमभाव नांदत असल्याचे दिसून येते.
परंतु काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता असलेल्या नुपूर शर्मा व भाजप सोशल नेटवर्किंगची जबाबदारी सांभाळणारे नवीन जिंदल यांनी मुस्लीम समाजाचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी अपशब्द काढून मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावण्याचे काम केले. हे प्रकरण केवळ भारतापुरतेच राहिले नाही तर भारताबाहेर जेजे मुस्लिम देश आहेत त्यांनी त्या ठिकाणी भारताचा निषेध करण्यास सुरुवात केली.प्रधानमंत्री हे भारताचे सर्वोच्च पद आहे परंतु काही देशांनी तर प्रधानमंत्री याचा फोटो कचराकुंडी वर लावून निषेध केला.प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर जेवढे काही मुस्लीम देश आहेत त्यांनी अशी ही मागणी केली की भारतातून व प्रामुख्याने भाजप सरकारच्या कार्यकर्त्याने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल भारताने जाहीर माफी मागितली पाहिजे.भारताला माफी मागायला लावणारे हे जे देश आहेत ते भारतातील एका राज्यएवढेच आहेत परंतु आज भारतासारख्या विशाल काय देशाला माफी मागण्यास लावत असतील तर भारताची जगामध्ये किती नामुष्की होत असेल हे आपण समजले पाहिजे.
एकंदरीत हे सर्व प्रकरण जागतिक पातळीवर पेटलेले असताना आता याचे पडसाद हळूहळू संपूर्ण भारतामध्ये सुद्धा उमटण्यास सुरुवात झालेली आहे. मुस्लिम समाज संपूर्ण भारतामध्ये ठीकठिकाणी लाखोंचे मोर्चे,आंदोलने काढून नुपुर शर्मा व नवीन जिंदल यांच्या अटकेची मागणी करत आहे.परंतु भारतीय जनता पार्टी चे केंद्रामध्ये सरकार असतानासुद्धा या दोघांविरुद्ध कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. त्यामुळे भाजप सारख्या कडवट जातीवादी व हिंदुत्ववादी पक्षाला इतर जाती-धर्माचे अथवा समाज भावनेचे काही घेणेदेणे दिसून येत नाही.आतापर्यंत या ठिकाणी जर एखादा मुस्लीम बांधव असता तर त्याला देशद्रोही घोषित करून कधीच अटक केली असती. परंतु जातीयतेणे व ब्राह्मणी विचाराने ग्रसित झालेली भाजपा कोणताही निर्णय घेण्यास तयार नाही नुपुर शर्मा हिचे प्रेषित मोहम्मद पैगंबर आणि विषयी बोललेले वादग्रस्त वक्तव्य हे वैयक्तिक असू शकते हे आम्ही मान्य करू परंतु समाजामध्ये अशांतता निर्माण करणारी वक्तव्य करून व समाजातील बलस्थान्नाना हात घालून तुम्ही काय सिद्ध करू इच्छित आहात समाजा समाजामध्ये शांतता एकता बंधुभाव व एकमेकांप्रती असलेला आदर हा जर कायम ठेवायचा असेल तर समाजामध्ये अशा प्रकारच्या वाईट विचारांच्या व्यक्तींचा वेळीच बंदोबस्त करावयास हवा त्याचप्रमाणे केंद्रातील भाजप सरकारने नुपूर शर्मा व नवीन जिंदल या दोघांना वेळीच अटक केली नाही तर करमाळा शहरांमध्येही सर्वपक्षीय असा महामोर्चा काढण्यात येईल यावेळेस उद्भवणार्या सर्व परिस्थिती पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील?