👉 निरवांगीत नंदिकेश्वर मंदिरामध्ये हजारोंच्या उपस्थितीत महाअभिषेक.
निरवांगी:इंदापूर तालुक्यातील निरवांगी येथील हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नंदिकेश्वर मंदिरामध्ये हजारोंच्या उपस्थितीत इंदापूर तालूक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी श्रावण महिन्याच्या निमित्ताने शंभु महादेवाचा विधिवत महाअभिषेक घालून भरपूर पाऊस पडून माझा शेतकरी बांधव सुखी आणि समृद्धी होऊ दे अशा प्रकारची मनोभावे साकडे शंभु महादेवाला घातले.याप्रसंगी वालचंदनगर,निमसाखर, निरवांगी, दगडवाडी,खोरोची,रेडणी पंचक्रोशीतील भाविक भक्तांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील यांनी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी रस्ते, पाणी,निरा नदीवरील बंधारे यासाठी भरघोस निधी उपलब्ध केल्याने या भागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न कायमस्वरूपी सुटले असल्याचे सांगून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना काहीच काम नसल्याने न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करून जनतेची दिशाभूल करत असल्याचे सांगून त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.आमदार भरणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना निरा नदीवरील बंधारे दुरूस्तीसाठी तावशीपासून ते चिखलि,कुरवली,निमसाखर खोरोची, यासाठी गेल्या वर्षी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ११ कोटींहून अधिकचा निधी मंजूर झाला असल्याचे सांगून कार्यक्रमस्थळावरून उपस्थितांसमोर कार्यकारी अभियंता धोडपकर यांच्याशी संपर्क साधून कामे मंजूर करण्यापासून ते टेंडर होईपर्यंतची वस्तुस्थिती उपस्थितांना ऐकवून न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये असल्याचे सांगून जनतेला वीस वर्षे खोटे बोलत आलात देवाच्या दारात तरी खोटे बोलू नका असा मार्मिक सल्ला भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना देऊन आपण वीस वर्षे मंत्रिपदावर राहून आपल्यावरती आपल्या गावाशेजारील प्रेम करत आलेल्या जनतेच्या दळणवळणासाठी आपल्याला निरनिमगाव , बोराटवाडी,खोरोची या परिसरातील शेतकरी बांधवांच्या सोईसाठी, दळणवळणासाठी आपल्याला नदीवर पूल का बांधता आले नाहीत असा प्रश्न उपस्थित करून ते काम मी केले असून सदरची कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगून आपणास इंदापूर तालुक्यातील विकासकामे करता आली नाहीत म्हणूनच मला येथील जनतेने दोन वेळा निवडून दिल्याचे सांगून आपणास कोणताही अधिकार नसून आपण आपल्या ताब्यातील असलेल्या साखर कारखान्यातून माझ्या शेतकरी बांधवांनी घाम गाळून कष्टाने आणलेल्या ऊसाची बिले वेळेवर द्यावीत असा सल्लाही याप्रसंगी दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना देऊन इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी सदैव कटिबध्द असल्याची जाहीर ग्वाही भरणे यांनी यावेळी उपस्थितांना यावेळी दिली.तसेच नंदिकेश्वर मंदिर परिसरात ओपन जिम बसवणार असल्याचे आश्वासनही आमदार श्री दत्तात्रय मामा भरणे यांनी यावेळी उपस्थितांना दिले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी निमसाखरचे सरपंच धैर्यशील रणवरे पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ, विरसिंह रणसिंग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री सचिन देवकर,दगडवाडीचे मा.सरपंच बबन रासकर, किसन पिंगळे, उपसरपंच रामदास रासकर, किसन मोटे,खोरोची गावचे मा.उपसरपंच देवकर भाऊसाहेब,सतिश हेगडकर,संपत सरक,दादा भाळे,पिटकेश्वर मा.सरपंच संजय कांबळे,दगडवाडीचे मा.उपसरपंच अंकुश चव्हाण,सचिन रासकर,निमसाखरचे सदस्य दिपक लवटे,निरवांगीचे जेष्ठ नेते विठ्ठल पवार,श्री निलेश रासकर,महेश रासकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस रणजित रासकर यांनी मानले.