बोरी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा, थेट सरपंचपदी मंदा ठोंबरे यांच्या निवडीनंतर उपसरपंच पदी राजेंद्र शिंदे यांची निवड.

बोरी (प्रतिनिधी:प्रवीण पिसे)- इंदापूर तालुक्यातील बोरी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला झेंडा फडकवलेला असून सौ.मंदा विजय ठोंबरे या थेट जनतेतून सरपंच पदी निवडून आलेल्या आहेत. बोरी येथे उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली.इंदापूर तालुक्यात महत्त्वाच्या समजल्या जाणारी बोरी ही ग्रामपंचायत आहे. आज उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया नूतन सरपंच सौ.मंदा विजय ठोंबरे, निवडणूक निरीक्षक अधिकारी श्री. विक्रम वाघमोडे‌,ग्रामसेवक श्री.आटोळे भाऊसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.उपसरपंच पदासाठी श्री.राजेंद्र महादेव शिंदे व श्री.सचिन विष्णू धालपे या दोघांनी फॉर्म भरले. यामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे मतदान घेण्यात आले त्यामध्ये राजेंद्र महादेव शिंदे यांना आठ मते मिळाली तसेच सचिन विष्णू धालपे यांना सहा मते मिळाली. त्यामध्ये राजेंद्र शिंदे हे विजयी झाले व त्यांची उपसरपंच पदी निवड मतदानाच्या स्वरूपात करण्यात आली.या उपसरपंच पदाच्या निवडीवेळी ग्रामपंचायत सदस्य श्री.हरिदास वाघमोडे,सौ.गौरी संतोष धालपे,सौ.स्वाती मदन वाघमोडे,श्री.सचिन विष्णू धालपे,श्री.पांडुरंग सुभाष कुचेकर,सौ.अहिल्या मार्तंड नाचन,श्री.हनुमंत सदाशिव धायगुडे,सौ.कांचन दिलीप धायगुडे,सौ.मयुरी राहुल जाधव,सौ.प्रियंका निखिल ठोंबरे,सौ.ज्योती सागर शिंदे,श्रीमती.रुक्मिणी बापू जगताप हे सर्व नव-निर्वाचित सदस्य उपस्थित होते.त्यांना सहकार्य करणेकामी गावातील सर्व ग्रामस्थ समस्त उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here