अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि वारकऱ्यांच्या व मराठी मनाच्या अस्मिताचा विषय असणाऱ्या पंढरीची वारीचे काही दिवसात प्रस्थान होत आहे.22 जूनला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन इंदापूर शहरात होणार आहे आणि यावेळी प्रथमच इंदापूर शहरांमध्ये पालखीचा मुक्काम हा श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये न होता औद्योगिक वसाहतमध्ये होणार याची सर्वत्र चर्चा आहे. पण त्यापेक्षाही जादा चर्चा होत आहे ती औद्योगिक वसाहतीमध्ये शासनाने बांधलेल्या पालखी मुक्काम तळाच्या पत्र्याच्या शेडची…
गेल्या काही दिवसापासून प्रसारमाध्यमांमध्ये बातमी प्रसारित होत होत्या यामध्ये मुक्काम ठेवण्यात आलेल्या पालखी स्थळाच्या शेडची किंमत तब्बल 1 कोटी 41 लाख रुपये आहे असे समजले. आणि यावरूनच इंदापूर शहरासह तालुक्यात एकच चर्चा रंगली होती. यामध्ये खरच एवढ्या ज्यादा प्रमाणात या शेडला खर्च झाले असेल का? हा खरंतर प्रश्न सर्वांसमोर पडलेला होता. आणि याच बाबत शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा कल्याणकर यांनी विजयबापू शिवतारे यांच्याकडे यासंदर्भाचे गाऱ्हाणे मांडले.माजी राज्यमंत्री शिवतारे बापू यांनी सर्व हकीकत ऐकून घेतल्यानंतर सदरची चौकशीही मुख्यमंत्री लेवलला होईल कारण संत तुकाराम महाराज पालखी आणि वारकरी हे महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने यामध्ये थोडीही गडबड चालणार नाही असे विजय बापू शिवतारे म्हणाले.यानंतर लगेचच विजय बापू शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून या कामाची चौकशी करण्याची विनंती केली. त्यांनी लिहिलेल्या पत्रात असे म्हणले आहे की,”सदरच्या मुक्काम स्थळाच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून याबाबत संबंधित कार्यालयातील अधिकारी सकारात्मक उत्तर देत नाहीत त्यामुळे याची चौकशी करावी अशा आशयाचे पत्र थेट मुख्यमंत्री साहेबांना दिले आहे.महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदाय पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या पायी वारीत सहभागी होतो त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्या पण इंदापूर येथे नवीन पालखी तळ मुक्काम ठिकाणी झालेलं काम व त्याचा दर्जा याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी असे निवेदन महिला आघाडीच्या वतीने दिले यावेळी अँड गितांजली ताई ढोणे शिवसेना बारामती लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख यांच्या उपस्थितीत विजय बापू शिवतारे उपनेते शिवसेना निवेदन यांना देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष रूपाली ताई रासकर उपस्थित होत्या. एकंदरीतच पालखी मुक्कामाच्या पत्र्याच्या शेडचा विषय आता मुख्यमंत्री स्तरावर होणार त्यामुळे आकडेवारी खरी की खोटी हे लवकरच जनतेच्या समोर येईल अशी आशा वाटते.
Home Uncategorized इंदापूर येथील संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामाच्या तळाच्या कामाची मुख्यमंत्री स्तरावर चौकशी...