बस चालकाने बसमध्येच संपविला जीवनप्रवास, चालकाच्या आत्महत्या नंतर बसप्रशासन व पोलिसांचा हलगर्जीपणा.. कधी संपणार एसटी कामगारांच्या नरकयातना ??

महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एकमेव सेवा दिणारी गाडी म्हणजे एसटी. एसटी सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे.आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे एसटी. हीच एसटी चालवणेसाठी तेथील कर्मचाऱ्यांना काबाडकष्ट करावे लागते आणि एवढे करूनही त्यांची कौटुंबिक अडचणी त्यांच्या छोट्याशा पगारावरून सुटत नाहीत कदाचित यामुळेच बस कामगारांचे आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे असाच एक आत्महत्येचा प्रकार घडलेला आहे याबद्दल सविस्तर माहिती अशी की,एसटीच्या घंटी वाजवण्याच्या दोरीने बस चालकाने गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. बस आगारामध्येच घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.मात्र आत्महत्येनंतर एसटी कर्मचाऱ्याच्या मृतदेहाची हेळसांड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हिरामण देवरे असं आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. हिरामण हे पुण्यातील शिवाजीनगर आगारात कार्यरत होते. शनिवारी पुण्याहून ते एसटी घेऊन धुळ्याला आले होते. त्यावेळी त्यांनी आगारमधील बसमध्येच घंटीच्या दोरीने फास घेत आपली जीवनयात्रा संपवली. देवरे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. धुळे पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.
रुग्णवाहिका बोलवून देवरे यांचा मृतदेह रुग्णालयात नेणं अपेक्षित होते, मात्र तसं न करता, धुळे आगार प्रशासनाने आणि पोलिसांनी त्यांचा मृतदेह एका एसटी बसमध्ये पुढील वैद्यकीय तपासणीसाठी नेला. काही कर्मचाऱ्यांनीही दबव्या आवाजात याबाबत नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, काही वेळ थांबून रुग्णवाहिकेत देवरे यांचा मृतदेह नेला असता तर त्याची अशी अवहेलना झाली नसती. प्रशासनाने सबुरीने घेत देवरे यांच्या मृतदेहाला सन्मान देऊन तो व्यवस्थित रुग्णालयात तपासणीसाठी पाठवणं आवश्यक होतं, मात्र तसं झालं नाही.👉 एसटी हाकतो, पण संसाराचा गाडा कसा हाकू?:
आज सरकारी कर्मचाऱ्यांना एकीकडे 70 ते 80 हजार पगार मिळतो. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांना 10 ते 12 हजारावर आपलं संसाराचा गाडा हकलावा लागतो. 10 ते 12 हजार रुपयांत मुलांचं शिक्षण, किराणा, दवाखाना, घरभाडे, वगैरे..वगैरे हे सर्व गोष्टी आपल्या तुटपुंज्या पगारावर एसटी कर्मचारी भागवत असतात. कालानुरुप एसटीच्या सेवेत कसा बद्दल झाला किमान त्याप्रमाणात का होईना पगारामध्ये वाढ करणे सरकारने आवश्यक आहे.

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here