फिट अँड हेल्थ क्लब दौंड च्या वतीने सिद्धटेक येथील सिध्दीविनायकास ११११ सुर्यनमस्कार अर्पण

प्रतिनिधी:महेश सूर्यवंशी
दौंड शहरात शारिरीक आरोग्य सोबतच मानसीक आरोग्यसाठी सुप्रसिद्ध असलेल्या फिट & हेल्थ क्लब च्या ५० सभासदांनी गणेशोत्सवच्या निमित्ताने श्री क्षेत्र सिद्धटेक येथे आरोग्य जनजागृति कार्यक्रम अंतर्गत ११११ सामुहिक सुर्यनमस्कार करून सिध्दीविनायकास अनोखी भेट दिली.
क्लब च्या संस्थापक योगशिक्षक डॉ सुनीता कटारिया ,डॉ संदीप कटारिया , योगशिक्षक अमीर शेख , योग शिक्षक राहुल भंडारी ,योगशिक्षक प्रज्ञा राजोपाध्ये , मेघना डाळिंबे यांचे संकल्पनेतून सादर करण्यात आलेल्या अनोख्या उपक्रमास देवस्थान चे श्री मयूरेश्वर पुरोहित यांनी उपस्थित राहुन मार्गदशन केले यावेळी सिद्धटेक चे ग्रामविकास अधिकारी श्री विकास हागारे ,क्लब चे सदस्य श्याम डावरा ,महेश राजोपाध्ये , दौलत लुंड ,अमित वागजकर ,दिनेश अडसुळ ,नवनाथ गोरे ,डॉ राजेश दाते,महेश भागवत ,हरिभाऊ ठोंबरे ,प्रकाश सोनवणे ,व सर्व सभासद सहभागी झाले.आरोग्य हीच संपत्ति आहे व निरोगी शरिरासाठी सुर्यनमस्कार हा अतिशय उपयुक्त व्यायाम प्रकार आहे असे डॉ सुनीता कटारिया यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here